आळंदी, ता. २ : आळंदी (ता. खेड) शहरात रस्त्याच्या दुतर्फा उभ्या वाहनांची गर्दी आणि विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी नित्याने होत आहे. याला आळा घालण्यासाठी आळंदी शहर वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या मधोमध बॅरिगेड आणि दोरी लावून नियोजन केले आहे. त्यामुळे विरुद्ध बाजूने येणारी वाहने आणि बेशिस्त वाहन चालकांना दोरीत चला, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा आळंदी शहर वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
आळंदीत सतत वाहनांची मोठी वर्दळ असते. याचबरोबर गुरुवार, रविवार, एकादशी या दिवसात भाविकांची मोठी गर्दी होते. तसेच, लग्नाला येणारे वऱ्हाडींचीही मोठी गर्दी असते. त्यातच खासगी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि उबेर, ओला कंपनीच्या गाड्या रस्त्यावर दोन्ही बाजूच्या कडेला उभ्या असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. याचबरोबर विरुद्ध बाजूने येणारे दुचाकी वाहत आणि चारचाकी वाहन चालकांची संख्या लक्षणीय असल्याने सतत वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनी आळंदी शहरात नगरपरिषद चौक प्रदक्षिणा रस्ता मार्गावर, तसेच मरकळ चौक या भागात बॅरिगेड लावले आहेत. यामुळे रस्त्याच्या मधून गाड्या घालण्याचे प्रमाण कमी झाले आहे. विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांच्या संख्येवर काहीसा आळा बसणार आहे. त्यामुळे आळंदीत गाडीने प्रवास करायचा असेल तर दोरीत चालावं लागेल, असाच संदेश आळंदी वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
पोलिसांकडून फक्त दंडात्मक कारवाई
नगर परिषद चौक, चाकण चौक आणि प्रदक्षिणा रस्त्यावर विविध ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी गाड्या उभ्या असतात. त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई वाहतूक पोलिसांकडून केली जाते. वाहन मात्र जागेवरच उभे असते. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. रस्ता मोठा असूनही त्याचा वापर नीट होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रस्त्यावर उभ्या चारचाकी वाहनांवर वाहने उचलण्याची कारवाई करणे आवश्यक आहे. आळंदी पोलिसांना टोइंग व्हॅन मिळाली. मात्र, केवळ दुचाकी वाहनेच उचलली जात असल्याने चारचाकी वाहने मात्र बिनधास्त रस्त्याच्या बाजूला उभी असल्याचे चित्र आहे.
07098
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.