आळंदी, ता. ६ : आळंदी नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील शाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच, शाळेतील स्वच्छ, सुरक्षित वातावरण आणि शालेय पोषण आहाराची गुणवत्ता राखून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी नगरपरिषदेच्या शालेय शिक्षण विभागास दिल्या.
यावेळी आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कुऱ्हाडे यांसह मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगरसेवक सचिन गिलबिले, आदित्य घुंडारे, दिनेश घुले, सुरेश झोंबडे यांनी शाळेची इमारत व शैक्षणिक सुविधांबाबतची पाहणी केली. यादरम्यान शाळेची स्वच्छता व्यवस्था, शालेय पोषण आहार योजना तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व दैनंदिन बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, अभ्यासाविषयीची आवड, शाळेतील उपलब्ध सुविधांबाबत माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले.
शाळांच्या सुविधा वाढविण्यासाठी शाळेला कंपाउंड वॉल, क्रीडांगण, वर्गखोल्यांची दुरुस्ती, स्लॅब दुरुस्ती, संगणक प्रयोगशाळा व विज्ञान प्रयोगशाळा आदी कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात निविदा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.