पुणे

पिंपळवंडी येथे २२ वर्षांनी पुन्हा भरला बारावीचा वर्ग

CD

आळेफाटा ता. २ : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील सुभाष विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील २०००-०१मधील इयत्ता बारावीच्या विद्यार्थांचा स्नेहमेळावा नुकताच आयोजित केला होता. यावेळी २२ वर्षांनी जुने मित्र एकमेकांणा भेटल्याने सर्वजण भारावुन गेले होते.
याप्रसंगी सरस्वती माता, तसेच दिवंगत दशरथ काकडे, दिवंगत मारूती लेंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मनोरंजन वामन, संजय उंडे, नवनाथ डुबाले, राजाराम कापसे या गुरुजनांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आला.
यावेळी शिक्षकांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘‘आमचे विद्यार्थी हे डॉक्टर, इंजिनिअर झाले. कुणी शिक्षक, वकील, समाजसेवक, तर कुणी राजकारणी होऊन चांगल्या पदावर काम करत आहेत. याचा आम्हा शिक्षकांना अभिमान आहे.’’ याप्रसंगी डॉ. प्रशांत काळचे यांनी ‘चाळीशीनंतर आरोग्याची कशी काळजी घ्यावी’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर, प्रा. संपत गुंजाळ यांनी ‘बदललेली शिक्षण पध्दती व पालकांची जबाबदारी’ याबाबत मार्गदर्शन केले. विनायक वामन, डॉ.प्रदिप टाकळकर, अजित लेंडे, स्वप्निल वाघ यांनी
स्नेहमेळाव्याचे नियोजन केले. संपत गुंजाळ व‌ सुरेखा काकडे यांनी सुत्रसंचालन केले, आनंद नाईक यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Search December 2025 : डिसेंबर 2025 मध्ये गुगलवर सर्वांत जास्त काय सर्च झाले? धक्कादायक रिपोर्ट आले समोर

Latest Marathi News Live Update : शहर चालवायचं असतं, बँक खातं नाही; चित्रा वाघांचा ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

Phulambri News : शाळेसाठी जीव धोक्यात! एकदा पडले, तरी थर्माकोलवरून प्रवास सुरूच

MLA Jayant Patil: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढूया: आमदार जयंत पाटील; आघाडीबाबत नेमकं काय म्हणाले?

NMMC Election: कोट्यधीशांचा बोलबाला! नवी मुंबईमध्ये २६६ उमेदवारांची संपत्ती कोटीपार; पाहा यादी

SCROLL FOR NEXT