पुणे

आळेफाटा उपबाजारात कांद्याची विक्रमी आवक

CD

आळेफाटा, ता. २ : आळेफाटा येथील उपबाजारात शुक्रवारी (ता. १) दहा हजार ३७३ कांदा पिशवींची विक्रमी आवक होऊन एक नंबर कांद्यास दहा किलोला १७५ रुपये बाजारभाव मिळाला असल्याची माहिती सभापती संजय काळे उपसभापती प्रीतम काळे, सचीव रूपेश कवडे, व्यवस्थापक दीपक म्हस्करे यांनी दिली.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोढयांत एक नंबर सुपर गोळा कांद्यास दहा किलोस १६० ते १७५ रुपये बाजार भाव मिळाला होता. तसेच एक नंबर कांद्यास १४० ते १६० बाजारभाव मिळाला‌‌. दोन नंबर कांद्यास १२० ते १४० रुपये बाजारभाव मिळाला. तर तीन नंबर कांद्यास दहा किलोस १०० ते १२० रुपये बाजारभाव मिळाला तर बदला, चिंगळी कांद्यास दहा किलोस ३० ते ८० रुपये बाजार भाव मिळाला.
दरम्यान, काही दिवसांपासून वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक करून ठेवला होता तो सडू लागला आहे. तो कांदा शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेला दिसून येत आहे. सध्या मिळणारा बाजारभाव अतिशय कमी असून या बाजारभावातुन शेतकऱ्यांचा झालेला खर्च फिटत नसल्याने शेतकरी अडचणीत आलेला दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटातील गाडी नेमकी कुणाची? महत्त्वाची अपडेट समोर...

Amit Shah on Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Delhi Red Fort blast Live Update : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रूग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट; घटनास्थळाचीही पाहणी केली

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

SCROLL FOR NEXT