पुणे

जुन्नरमध्ये तागाच्या शेतीला शेतकऱ्यांची पसंती

CD

आळेफाटा, ता.१४ : जुन्नर तालुक्यात कोणतेही पीक घेण्याचे अगोदर बहुतांश शेतकरी आता तागाचे पीक घेत आहेत. रासायनिक खतांचा दिवसेंदिवस वापर तसेच पाण्याच्या अनिर्बंध वापरामुळे जमिनी क्षारयुक्त व क्षारपड बनत चालल्या आहेत. जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांवर अनिष्ट परिणाम होत आहे. हिरवळीच्या खतासाठी ताग घेतल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि अत्यावश्यक अन्नद्रव्यांमध्ये वाढ होते व उत्पादन वाढते. यामुळे शेतकरी तागास पसंती देत आहेत.
सेंद्रिय खतासाठी शेणखत, हिरवळीचे खत, गांडुळ खत, प्रेसमड कंपोस्ट खत, पाचट कंपोस्ट, कोंबडी खत, लेंडी खत, पेंडी वापरणे आणि शेतात शेळी, मेंढी बसविणे असे पर्याय आहेत. या सर्वांमध्ये अत्यावश्यक अन्नद्रव्याने संपन्न असलेला तागाचा हिरवळीच्या खतासाठी सर्वोत्तम पर्याय होत आहे.
जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आणि सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढून कार्यक्षमता वाढते.तसेच तागाच्या पिकाच्या मुळावरील गाठीमध्ये असलेले रायझोबियम जिवाणू हवेतील नायट्रोजन घेतात. नंतरच्या पिकाला जिवाणू नत्र हे नायट्रेट आणि अमोनियमच्या अवस्थेत उपलब्ध करून देतात. उसाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात नायट्रेट-नायट्रोजनचा वापर जास्त होतो. तागाचे पीक जमिनीतील खालच्या थरातील अन्नद्रव्य शोषून घेते.
जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म टिकवण्यासाठी ऊस घेण्यापूर्वी तागाचे पीक जमिनीत गाडल्याने रासायनिक खतांची सुद्धा उपलब्धता वाढल्याचे दिसून आले. सेंद्रिय पदार्थामुळे सूक्ष्म जिवाणू, गांडुळे, विकरे व सेंद्रिय आम्ले यांचे जमिनीतील प्रमाण वाढल्याने पिकांची चांगली वाढ होते.

कोणतेही पीक घेण्यापूर्वी शेणखताऐवजी तीन महिने अगोदर हिरवळीचे पीक म्हणून तागाची लागवड केल्यास हेक्टरी २५ ते ३० टन बायोमास मिळतो. दीड महिन्यात ताग सात फूट उंचीपेक्षा जास्त वाढतो. हा ताग जमिनीत गाडल्यानंतर त्यापासून हेक्टरी १२५ ते १३५ किलो नत्राची मात्रा मिळते. तागापासून दोर, सुतळी, गोणपाट, आणि कापड तसेच, तागाच्या पानांचा उपयोग भाजी म्हणून आणि खतासाठीही होतो. तागाच्या पानांचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून केला जातो, ज्यामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारते.
- राजश्री नरवडे, कृषी अधिकारी, जुन्नर
06823

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्ता वाढणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय प्रस्तावित

October 2025 Calendar: दसरा ते दिवाळी, यंदा ऑक्टोबर महिन्यात कोणते महत्त्वाचे सण आहेत? वाचा एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : सतेज पाटील यांना लाडकी बहीण योजना आवडली नाही? म्हणाले, योजनेने आमचा कार्यक्रम केला

Latest Marathi News Live Update: गुंड निलेश घायवळच्या घरातील सदस्य गायब

७०० + विकेट्स अन् १५ हजार धावा... ; महान क्रिकेटपटू त्याच्याच देशासाठी झाला परका! क्रीडा मंत्रालयाने घातली बंदी

SCROLL FOR NEXT