आळेफाटा, ता. १९ ः कोथरूडच्या ‘आपली सृष्टी’ सामाजिक संस्थेने बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील श्री संभाजी विद्यालयातील १० विद्यार्थ्यांना गणवेश व १० विद्यार्थिनींना जॅकेट तसेच दोन विद्यार्थी-विद्यार्थिनीला सायकलचे वाटप केले. यावेळी योगेश सोनवणे, विशाल पाटील, सचिन कटके, अमित राऊत आदींसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.