आळेफाटा, ता. २१ : ‘‘सर्व मंडळांनी नवरात्र उत्सव साजरा करताना पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरा करावा. मंडळांनी ऑनलाइन नोंदणी करून ज्या ठिकाणी घटस्थापना होत आहे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत,’’ अशा सूचना आळेफाटा (ता. जुन्नर) पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी केले.
नवरात्र उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. २०) येथील सौभद्र मंगल कार्यालयात घेतलेल्या पोलिस ठाण्याअंतर्गत सर्व गावांमधील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना जाधव बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, पंचायत समितीचे माजी सदस्य जीवन शिंदे, तळेगावचे सरपंच मुकुंद भंडलकर, शरदचंद्र पतसंस्थेचे संस्थापक जी. के. औटी, अशोक सोनवणे, भुजबळ, सयाजी लेंडे, दिलीप जाधव, राधिका कणसे, गावच्या पोलिस पाटील सुनीत मस्कुले, नम्रता कसाळ, सुजाता गायकवाड, शिल्पा शिंदे, प्रेरणा बांगर, दत्तात्रेय चौगुले, शुभांगी काकडे, हर्षल कुंजीर, मंगेश औटी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद गायकवाड यांनी केले तर सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी आभार मानले.
07053
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.