आळेफाटा, ता.२७ : झेंडूच्याफुलांचे बाजारभाव घसरल्याने जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील उत्पादक संकटात सापडले आहेत. सध्या फुलांची तोडणी सुरू आहे. परंतु नवरात्र असूनही झेंडूला चांगला बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत
राजुरी, बोरी बुद्रूक, साळवाडी, जाधववाडी, गुंजाळवाडी, आळे, वडगाव आनंद, कोळवाडी, संतवाडी आदी गावांतील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा झेंडूची लागवड केलेली आहे.
सध्या झेंडुला शेकडा ४० ते ५० रुपये बाजारभाव मिळत आहे. परंतु तो परवडणारा नाही. झेंडू लागवड ते तोडाणीला येईपर्यंत एक एकराला सुमारे तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च येतो. त्यातच मजुरांचे दरही वाढलेले आहेत. यात आणखीन भर म्हणजे यामध्ये ढगाळ वातावरणामळे पिकांवर वारंवार औषध फवारणी करावी लागत आहे. यामुळे खर्च आणखीनच वाढलेला आहे. त्यातच आणखीन भर म्हणजे पावसाळा सुरू असुन सुध्दा सध्याचे वातावरण कडक उन्हाळ्यासारखे जाणवत आहे .त्यामुळे या पिकाला पाणी कमी पडत असल्यामुळे मालसुद्धा जास्त निघत नाही हा सुद्धा फटका या पिकाला बसलेला दिसत आहे.
सध्या चालु असलेल्या नवरात्र उत्सवात बाजारभाव मिळत नसला तरी पुढील महिन्यात येत असलेल्या दीपावली सणात भावात वाढ होईल या आशेने शेतकरी झेंडूच्या फुलांची निगा राखत आहे, असे शेतकरी नेताजी डोके यांनी सांगितले.
07078
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.