राजेश कणसे : सकाळ वृत्तसेवा
आळेफाटा, ता.१३ : राजुरी (ता. जुन्नर) येथे श्रेणी २ चा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. शासनाने येथे इमारत बांधलेली असली तरी डॉक्टरांसाठी निवासस्थान अद्याप बांधलेले नाही. या ठिकाणी एक्स-रे मशिन नसल्याने येथील शेतकऱ्यांना बेल्हे येथे गाई व म्हशी घेऊन जावे लागते. पशुपालकांच्या ठिकाणी लॅबही आवश्यकता आहे.
दवाखान्यांतर्गत येणारी जनावरे
गाई ......४८००
म्हशी........२००
वासरे........५५०
पशुपालकांसाठी प्रशिक्षण सत्रे
पशुधन विकास अधिकारी पद रिक्त असले तरी दवाखान्यातर्फे वंधत्व निर्मुलन मोहीम राबविली जाते. दवाखान्यात गर्भ तपासणी बछड्याचा जन्मदर व वंदत्वाच्या नोंदी ठेवल्या जातात. पशुधनाची आरोग्य तपासणी करून औषधे पुरविली जातात. संकटात काळात चारा डेपो सुरू केला जातो. पशुसंवर्धन प्रशिक्षण क्रमांक राष्ट्रीय पशुधन मोहीम राबविण्यात आली. पशुपालकांसाठी प्रशिक्षण सत्रेची राबविली जातात. त्याचा लाभ आतापर्यंत ३४० जणांनी घेतला आहे. डिजिटल ऑनलाइन अर्ज डेटा एन्ट्री मोबाईल ॲपचा वापर सुरू आहे.
लसीकरण
लाळ्या खुकत ......३ हजार ७००
ब्रुसेलोसिस......३९०
शेळी, मेंढ्यांसाठी साठी .पी.आर/इटी.....१००
३५२.....वैरण बियाणांचे मागणी अर्ज
चारा उत्पादन क्षेत्र - १२०० हेक्टर
ओलीताखाली क्षेत्र - १००० हेक्टर
उपलब्ध चारा टनांत (वार्षिक)
हिरवा चारा.......९०
वाळलेला चारा.......४
मागील महिन्यातील कृत्रिम रेतन संख्या......९०
राजुरी परिसरात प्रमाणावर दूध व्यवसाय चालत असून, येथील शेतकऱ्यांकडे चांगल्या जातीच्या गाई म्हशी आहेत. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये जंतनाशके, टॉनिक, प्रतिजैविक, लिव्हर टॉनिक, वांझपणाचा औषध, चाटण, विटा आदी प्रकारची औषधे आहेत. गाई म्हशींची निगा राखण्यासाठी व चांगल्या प्रतीचे दूध निघण्यासाठी गवळ्यांनी मुक्त गोठा करावा व चाऱ्यासाठी मुरघासचा वापर करावा.
- डॉ. श्रीरंग बढे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी
07327