आळेफाटा, ता. १३ ः आळेफाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या गाय बाजारात ३७१ गाईंची विक्री होऊन ८० लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रितम काळे, सचिव रूपेश कवडे व आळेफाटा येथील कार्यालय प्रमुख दिपक म्हस्करे यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील हा सर्वात मोठा बाजार असून या ठिकाणी संकरीत दुधाळ जातीच्या गाई विक्रीसाठी येतात. या आठवडयात भरलेल्या बाजारात पाच हजारांपासून ते ८० हजार रुपयांपर्यंत गायींची विक्री झाली. या वेळी गाईंची विक्रमी आवक होऊन किमतीदेखील वाढल्या होत्या. तरीही, विक्री चांगल्या प्रमाणात झाली. अशी माहिती ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, तान्हाजी कुऱ्हाडे, अमोल कुऱ्हाडे, रोहिदास निमसे, चॉंद शेख, उस्मान शेख, हबीब शेख, महंमद यासिर, जब्बार पठाण या व्यापाऱ्यांनी दिली.