पुणे

कांदा उत्पादकांच्या डोळ्यात असू

CD

आळेफाटा, ता. १६ : जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात कांद्याच्या काढणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही बाजार भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या कांद्याला ५ ते १२ रुपये प्रति किलो दर मिळत असून यामधून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. इंधनाचे भरमसाट वाढलेले दर, मजुरी, मशागत या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रासायनिक खते तसेच औषधाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने उत्पादन खर्चात गेल्या वर्षीच्या तुलनेने दुप्पट वाढ झाली आहे. सध्या मिळत असलेला बाजार भाव हा अतिशय कमी असून यातून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे.
आळेफाटा परिसरातील आळे, राजुरी, वडगाव आनंद, बोरी बुद्रूक, बोरी खुर्द, कोळवाडी, संतवाडी, उंचखडक, वडगाव कांदळी या गावांमधील शेतकऱ्यांनी साधारणपणे जुलै, ऑगस्ट महिन्यात लावलेला कांदा सध्या काढणीला आला आहे. चालू वर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून यामुळे काही प्रमाणात उत्पादनात घट आली आहे. कांदा जास्त काळ टिकून राहील की नाही याबाबत शेतकऱ्यांना साशंकता आहे तसेच एका किलोला साधारणपणे १२ ते १४ रुपये खर्च येत आहे व सध्या मिळत असलेला भाव अतिशय कमी मिळत असल्याचे बळीराजाचे म्हणणे आहे.

मजुरांअभावी शेतकरी मेटाकुटीला
कांदा काढणीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची कमतरता या वर्षी आहे. कांदा काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने ३०० रुपये असणारी मजुरी ५०० रुपयांपर्यंत गेली असल्याने एकरी १६ ते २१ हजार रुपये कांदा काढणीचा खर्च शेतकऱ्यांना येत आहे. मजुरांना मजुरी बरोबरच प्रवास खर्च द्यावा लागत असल्याने खर्चात वाढ झाली.

गेल्या वर्षापेक्षा यावर्षी कांद्याच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. त्यातच शासनाने कांद्याची निर्यात बंद केल्याने बाजारभाव अतिशय कमी आहे. झालेला खर्च सुद्धा निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने उत्पादन खर्चावर हमीभाव देऊन कांदा खरेदी करावा व कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे.
- संदीप कोरडे, कांदा उत्पादक शेतकरी

07344

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Bride killed on Wedding Day : लग्नादिवशीच नवरीचा खून करुन नवरदेव फरार, पोलिस तपासात धक्कादायक कारण समोर

villagers protest: नरभक्षक बिबट्याला ठार करा: ग्रामस्थांची मागणी; कर्जुनेखारे, निंबळक, इसळक, हमीदपूर ग्रामस्थांचा रास्तारोको

Satara Accident:'सातारा-बामणोली एसटीला डंपरची जाेरदार धडक'; वीस प्रवासी जखमी, धोकादायक वळण अन्..

Latest Marathi Breaking News : देश -विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT