आळेफाटा, ता. २२ : सध्या जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बिबट्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे.
जुन्नर तालुका हा बिबट्या प्रवण क्षेत्रात मोडत आहे. यामध्ये विशेष करून आळेफाटा परिसरातील राजुरी, बोरी, जाधववाडी, साळवाडी, आळे, वडगाव आनंद, आळे कोळवाडी संतवाडी ही गावे बिबट्या प्रवण क्षेत्रात मोडत असून येथील नागरिकांना दररोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होत आहे. गेल्याच आठवड्यात वडगाव आनंद येथील आदित्य संतोष भुजबळ व अविनाश सुरेश औटी, प्रणव नामदेव शिंदे या युवकांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते, तर राजुरी या ठिकाणी धनराज दत्तात्रेय औटी हा मुलगा शाळेतून घरी जात असताना बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला, तर याच गावात दोन मेंढपाळांच्या मेंढ्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातून पिंपळगाव जोगे धरणाचा डावा कालवा गेल्यामुळे या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेले असून त्यांना लपण्यासाठी जागा मिळत आहे. त्यातच जंगलाचे प्रमाण अतिशय कमी झालेले असून बिबट्यांना त्यांचे खाद्य मिळत नसल्याने ते मानवी वस्तीमध्ये येऊ लागले आहेत. ते मनुष्यावर तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत.
सध्या तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बिबट्याची दहशत वाढलेली असून, नागरिकांनी रात्रीचे बाहेर पडताना सावधपणे बाहेर पडावे, तसेच पालकांनी आपल्या मुलांना शाळेत स्वतः घेऊन जाणे तसेच घराबाहेर अंगणात मुलांना एकटे खेळण्यासाठी सोडू नये.
- अनिल सोनवणे, वनपाल, आळे
सध्या आळेफाटा परिसरातील गावांमध्ये बिबट्याची दहशत वाढलेली असून, गेल्या महिनाभरात विविध ठिकाणी तीन ते चार युवकांवर तसेच पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केलेला आहे, तसेच या परिसरातील बेल्हे, तांबेवाडी, कोंबरवाडी, बांगरवाडी, गुंजाळ वाडी या ठिकाणी रात्रीची थ्री फेज लाइट असल्याने शेतकऱ्यांना शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागते, यामुळे महावितरण कंपनीने रात्रीची थ्री फेज लाइट न देता दिवसा द्यावी. यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचे शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागणार नाही, तसेच वन विभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवावी.
- वल्लभ शेळके, संचालक, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, राजुरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.