आळेफाटा, : ता. ३१ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात शुक्रवारी (ता.३०) २७ हजार ८१५ कांदा पिशव्यांची विक्रमी आवक झाली. प्रतवारीनुसार एक नंबर कांद्यास दहा किलोस १५१ रुपये बाजारभाव मिळाला आहे.
०बाजारारात दोन नंबर कांद्यास १३० ते १५०, तीन नंबरला ११० ते १३० तर बदला कांद्यास ३० ते ९० बाजारभाव मिळाला आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे सभापती संजय काळे व माजी उपसभापती प्रीतम काळे, कार्यालय व्यवस्थापक सतीष म्हस्करे यांनी दिली.
दरम्यान, येथील उपबाजारात समितीत दिवसेंदिवस कांद्याची आवक वाढत आहे. कांद्याचे बाजारभाव कमी होत चालले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या बाजारात नवीन कांदा काढणी जोरात सुरू असल्याने निघालेला कांदा बाजारात कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे, असे कांदा व्यापारी व्यापारी अनिल गडगे, शिवप्रसाद गोळवा, विजय कुऱ्हाडे, अरीफ पटेल यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.