बेल्हे, ता. २९ : बेल्हे (ता. जुन्नर) येथे श्री बेल्हेश्वर विद्यालय व भागशाळा साकोरी तसेच पारनेर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल कळस या विद्यालयांतील दहावीच्या २४१ विद्यार्थ्यांना ‘स्टडी बडी’ मोबाईल ॲप्लिकेशनचे मोफत वितरण करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी (पुणे) यांच्या वतीने व श्री बेल्हेश्वर माजी विद्यार्थी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी या ॲप्लिकेशनचे वितरण झाले.
बेल्हे येथे श्री बेल्हेश्वर विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्टडी बडी ॲप्लिकेशनसाठी जवळपास ३ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा निधी हा रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी (पुणे) आणि श्री बेल्हेश्वर माजी विद्यार्थी प्रतिष्ठानचे सदस्य अण्णासाहेब मटाले यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. संतोष मोरे, माजी अध्यक्ष दिपक सोनवणे, प्रायोजक अण्णासाहेब मटाले, विजय गोरडे, सुनील पाटे, पंकज महाले, बाळासाहेब कोते, बबनराव वाडेकर, दादासाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मगर आदी पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ, माजी सरपंच विश्वनाथ डावखर, अशोक घोडके, सुधाकर सैद, रामदास गुंजाळ, बबन गुंजाळ, योगेश शहा, विजय गाडेकर, शांताराम भालेराव, सुरेश पिंगट, सुमित बोरचटे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी रोटरीचे अध्यक्ष डॉ. संतोष मोरे यांनी रोटरी ही समाजसेवी संस्था असून, या ॲप्लिकेशनचा शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी तसेच समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.