पुणे

समर्थ अभियांत्रिकीच्या ११ विद्यार्थ्यांना नोकरी

CD

बेल्हे, ता. २९ : येथील समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांची विविध मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे यांनी दिली.
ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने कॅम्पस ड्राईव्ह २०२५ मल्टिनॅशनल कंपन्यांच्या माध्यमातून मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. इन्फोसिस कंपनीच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या डायव्हर्सिटी ड्राईव्हमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधील हर्षा शिंदे या विद्यार्थिनीची सिस्टीम ॲनालिस्ट म्हणून निवड झाली. पार्श इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये एमबीए विभागातून रोहिणी ननावरे, दीपाली कणसे व प्रथमेश रेडे या विद्यार्थ्यांची मार्केटिंग मॅनेजर या पदाकरिता निवड करण्यात आली.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग विभागातून यश कुटे या विद्यार्थ्याची डेटा ॲनालिस्ट म्हणून तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या चेतन शिरोळे याची सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून निवड करण्यात आली.
फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लिमिटेड ईव्ही विभाग यांच्यामार्फत घेतलेल्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून शिवम लामखडे तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन इंजिनिअरिंग विभागातून सुजित भोगाडे यांची निवड करण्यात आली. सागर डिफेन्स या कंपनीमार्फत घेतलेल्या मुलाखतीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातून किशोर भोगाडे व दीपक दाभाडे या विद्यार्थ्यांची ट्रेनी इंजिनिअर म्हणून निवड करण्यात आली.
ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. सचिन पोखरकर, प्रा. स्नेहा शेगर, प्रा. शुभम शेळके, प्रा.निर्मल कोठारी, प्रा.अमोल खतोडे, प्रा. नीलेश नागरे यांनी मुलाखतीचे यशस्वी नियोजन करण्यासाठी परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates: अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबीय बारामतीकडे रवाना

'गतिमान आणि ठाम नेतृत्व करणारा नेता...' अजितदादांबद्दल पोस्ट लिहिताना भावूक झाला रितेश देशमुख

Ajit Pawar Passed Away : अजित पवार यांची निधनाच्या काही मिनिटं आधी सोशल मीडियावर पोस्ट, काय म्हणाले होते ?

Ajit Pawar Family Tree : बारामतीपासून दिल्लीपर्यंत राजकीय वारसा; अनेकांना माहिती नाहीये पवार कुटुंबाची 'ही' प्रेरणादायी कहाणी

Devasted, सुप्रिया सुळेंचं व्हॉटसअप स्टेटस; अनिल देशमुख, धनंजय मुंडे, मुश्रिफांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT