बेल्हे, ता. १७ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ शैक्षणिक संकुलात गुरुवारी (ता. ११) व शुक्रवारी (ता. १२) तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपले कौशल्य सादर केले.
समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे, पुणे जिल्हा परिषद, जुन्नर पंचायत समिती (शिक्षण विभाग) आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांचे वतीने याचे आयोजन केले होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तबाजी वागदरे, जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक काकडे, विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर केंद्रे, सचिव प्रकाश जोंधळे, तुषार आहेर, प्राचार्य वैशाली आहेर आदी उपस्थित होते.
स्पर्धा निकाल अनुक्रमे :
संगणकीय सादरीकरण : सहावी ते आठवी- वेदिका नलावडे (शिवनेरी विद्यालय, धोलवड), प्रांजल दाते (समर्थ गुरुकुल, बेल्हे), नील भंडारी (विद्या विकास मंदिर, राजुरी). नववी ते बारावी - स्निग्धा ढमाले (समर्थ ज्युनिअर कॉलेज, बेल्हे), अंजली खेत्री (चैतन्य विद्यालय, ओतूर), आर्या गडगे (शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, आळेफाटा)
वक्तृत्व स्पर्धा : सहावी ते आठवी- प्रचिता कणसे (गाडगे महाराज विद्यालय, ओतूर), श्रीकला खेबडे (गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यालय, नारायणगाव), नमिता डुकरे (महात्मा गांधी हायस्कूल, पारगाव), आराध्य गलांडे (ज्ञानमंदिर हायस्कूल, आळे). नववी ते बारावी - सई ससाने (शंकराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर), किमया आरोटे (श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर, बेल्हे), रुचिता बढे (न्यू इंग्लिश स्कूल, नगदवाडी).
वक्तृत्व स्पर्धा : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गट- राजू वामन (आदिमाया शक्ती विद्यालय, इंगळुन), संतोष डुकरे (जिल्हा परिषद शाळा, बेल्हे), संगीता रिठे (समर्थ ज्युनिअर कॉलेज, बेल्हे).
भित्तिपत्रक (पोस्टर मेकिंग) : सहावी ते आठवी- नचिकेत सूर्यवंशी (चैतन्य विद्यालय, ओतूर), साई परदेशी (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर), श्रावणी चौधरी (समर्थ गुरुकुल, बेल्हे). नववी ते बारावी - युवराज क्षीरसागर (ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल, आळे), आर्या घाडगे (एम. एम. बी. पी., पिंपरी पेंढार), वैष्णवी बांगर (न्यू इंग्लिश स्कूल, शिरोली बुद्रुक).
विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धा नववी ते बारावी : चैत्राली गुंजाळ, स्निग्धा ढमाले (समर्थ ज्युनिअर कॉलेज, बेल्हे), आदित्य खराडे, मंदार तिकोने (मॉडर्न इंग्लिश स्कूल, बेल्हे), आरुष शेरकर, वैष्णव थोरात (रा. प. सबनीस ज्युनिअर कॉलेज, नारायणगाव).
चला प्रयोग करूया स्पर्धा सहावी ते आठवी - श्रीनिका शेळके (समर्थ गुरुकुल, बेल्हे), श्रीराज जाधव (चैतन्य विद्यालय, ओतूर), स्वरूप जगदाळे (श्री विघ्नहर विद्यालय, ओझर), रिद्धी ताजने (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय,जुन्नर). नववी ते बारावी - ओजस जाधव (गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यालय, नारायणगाव), अर्णव लोखंडे (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर), सानिका बांगर (समर्थ गुरुकुल, बेल्हे), तेजल हांडे (श्री महालक्ष्मी विद्यालय, उंब्रज), आर्यन डुंबरे (गाडगे महाराज विद्यालय, ओतूर)
आयडिया बॉक्स : पायल शिंदे (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर), समृद्धी शेळके (समर्थ गुरुकुल, बेल्हे), धनेश नानावती शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर), उत्तेजनार्थ- तेजस्विनी आहेर (समर्थ गुरुकुल, बेल्हे)
हस्तकलेतील विज्ञान गट सहावी ते आठवी : श्रीनिका शेळके (समर्थ गुरुकुल, बेल्हे), सोहम दाभाडे (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर), स्वराज हांडे (श्री महालक्ष्मी विद्यालय, उंब्रज). नववी ते बारावी - ऋचा उंडे (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर), सार्थक गोडे (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर).
कौन बनेगा विज्ञानपती : श्रीनिका शेळके (समर्थ गुरुकुल,बेल्हे), संस्कार देशमाने, पियुष चिकने (समर्थ गुरुकुल, बेल्हे), समृद्धी शेळके, रिदा अत्तार (समर्थ गुरुकुल, बेल्हे). नववी ते बारावी - सार्थक गायकवाड (समर्थ गुरुकुल, बेल्हे), अथर्व यादव, रुद्र वाळुंज (देवकर विद्यालय, वडगाव आनंद), वैष्णव थोरात, आयुष शेरकर (रा. प. सबनीस ज्युनिअर कॉलेज, नारायणगाव).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.