पुणे

धामणी येथे टँकरने पाणीपुरवठा

CD

पारगाव, ता. १८ : पावसाने चांगलीच ओढ दिल्यामुळे धामणी (ता. आंबेगाव) गावातील वाडीवस्त्यांवर पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे येथे टँकरनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य प्रतीक जाधव यांनी दिली. टँकरचालकाचा धामणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करून टँकरची पूजा करण्यात आली.
पारगाव येथून पाइपलाइनव्दारे पाणी आणून सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाल्यामुळे आणि तत्कालीन गाव कारभाऱ्यांनी त्या योजनेची देखरेख योग्य पद्धतीने न केल्यामुळे गावातील ग्रामस्थांना या संकटाला सामोरे जावे लागत असल्याच्या आरोप करत या सर्व बाबी लक्षात घेऊन धामणी ग्रामपंचायतीने ताबडतोब पाठपुरावा करून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी लगेच टँकर मंजूर करून दिले.

यावेळी रंगनाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य सदस्य गणेश भुमकर, आशिष गाढवे, भाऊसाहेब करंडे, चेतन रोडे, संतोष पंचरास, जालिंदर जाधव, अक्षय रोडे, पंडित जाधव, नारायण जाधव, संदीप पवार, राहुल शिंदे, बाळासाहेब बोऱ्हाडे, काळूराम पंचरास,खुशाल जाधव, राहुल विधाटे, संजय जाधव, कपिल जाधव, लखन जाधव, भाऊ कदम, पोपट गवंडी, नवनाथ विधाटे, अक्षय जाधव, पोपट बोऱ्हाडे, धनेश बढेकर, नवनाथ विधाटे, प्रतिक विधाटे, दिनकर जाधव, गणेश जाधव, सुनील बोऱ्हाडे, विनोद वायकर उपस्थित होते.

02641

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

SCROLL FOR NEXT