पुणे

लाखणगावातील पुलाचे काम तातडीने करा

CD

पारगाव, ता. २४ : लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील बेल्हे- जेजुरी मार्गावरील घोड नदीवरील जुना पूल पावसाळ्यात पाण्याखाली जातो. त्यावेळी या पुलावरील वाहतूक ठप्प होते. तसेच, पुराच्या पाण्याने पुलाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. जुना पूल जड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. अडीच वर्षापासून बंद पडलेल्या नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बेल्हे- जेजुरी महामार्गाचे नव्याने काम झाल्याने या रस्त्यावरील वाहनांची वाहतूक वाढली आहे. नाशिक, नगर जिल्ह्यातील नागरिकांना सोलापूर, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, पावसाळ्यात घोडनदीला पूर आल्यावर जुन्या पुलावरून पाणी वाहू लागते, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होते. यावर्षीही बुधवारी (ता. २०) नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत होते. पुराच्या पाण्याने जुन्या पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पुलावरील डांबर उखडून भेगा पडल्या आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी तात्पुरती दुरुस्ती करत आहे. हा पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीला धोकादायक बनला आहे. अनेकदा या पुलावर जड वाहनांचे अपघात झाले आहेत. या ठिकाणी सुमारे १० कोटी रुपये खर्चाच्या नवीन पुलाचे ६० ते ७० टक्के काम झाले आहे. मात्र, अडीच वर्षापासून ते अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे. अद्याप ते काम सुरू झाले नाही. पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष सतीश रोडे पाटील, माजी सरपंच महादेव कानसकर, मार्तंड टाव्हरे, सोसायटीचे माजी अध्यक्ष महेश भोजने, शिरीष रोडे, किसन टाव्हरे, दस्तगीर मुजावर यांनी केली आहे.

05992

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: मतदार यादी गोंधळावरून रवींद्र चव्हाणांचा संताप, निवडणूक रद्द करण्याची मागणी; राजकारण पुन्हा तापलं!

इलेक्शन ड्युटी करणाऱ्यांच्या भत्त्यात मोठी वाढ, राज्य सरकारचा निर्णय, आता मिळणार दिवसाला 'इतके' रुपये....

IND vs SA, 2nd Test: रिषभ पंतला मैदानात पाहून आर अश्विन का झाला नाराज? म्हणाला, स्पष्ट संकेत...

Supriya Sule : 'धनंजय मुंडेंना पक्षातून काढून टाका'; वाल्मीक कराडवरील 'त्या' वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची अजिदादांकडे मागणी

Success Story: 'माेलमजुरी करणारा किशोर शिंदे झाला अधिकारी'; माऊलीला अश्रू अनावर, जिद्दीच्या जाेरावर आई-वडिलांचे स्वप्न साकार..

SCROLL FOR NEXT