पुणे

येणेरे आरोग्य केंद्रात अश्‍लील वर्तन; एकावर गुन्हा

CD

जुन्नर, ता. २६ : येणेरे (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याबद्दल संजय शांताराम नवले (रा. येणेरे, ता. जुन्नर) यांच्याविरोधात जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी (ता. २५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संजय शांताराम नवले हा येणेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेण्यासाठी आला असता त्याने महिला कर्मचाऱ्यांना अश्‍लील भाषेचा वापर करून या कर्मचाऱ्यांकडे एकटक नजरेने पाहून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; चार वेळा कार झाली पलटी, चालक जागीच ठार, गाडीचे दरवाजे कापून मृतदेह काढला बाहेर

Trimbakeshwar Land Acquisition : "कवडीमोल दरात जमिनी नकोत!" त्र्यंबकेश्वरच्या शेतकऱ्यांचा कुंभमेळा कामांना विरोध

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक

Aquarius Mahayog: कुंभ राशीत तयार होतोय दुर्लभ महायोग! ‘या’ राशींसाठी धोक्याची घंटा? जाणून घ्या संपूर्ण भविष्य

Nagpur News: सीईओ साहेब, केवळ एक सही द्या हो! शेकडो दिव्यांग विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ; जी. आर.चा फटका

SCROLL FOR NEXT