पुणे

नियुक्त कर्मचाऱ्यांना लेण्याद्रीत दुसऱ्यांदा प्रशिक्षण

CD

जुन्नर, ता. ३१ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेसाठी जुन्नर तालुक्यातील नियुक्त कर्मचाऱ्यांना लेण्याद्री येथे दुसरे प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सात फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. तर सात व आठ फेब्रुवारी रोजी बहुसंख्य शिक्षकांची केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असल्याने मतदान प्रक्रिया राबवायची की, पात्रता परीक्षा द्यायची? या संभ्रमावस्थेत शिक्षक कर्मचारी पडले आहेत.

दरम्यान, प्रशिक्षणस्थळी शिक्षक आपले हे गाऱ्हाणे मांडून मतदानाच्या प्रक्रियेतून वगळावे ही विनंती करत असताना संबंधित यंत्रणेकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी प्रशिक्षणस्थळी उपस्थित शिक्षकांकडून करण्यात येत होत्या.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षकांसह अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तालुक्यात ३६६ केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्त कर्मचाऱ्यांना लेण्याद्री येथे शुक्रवारी (ता. ३०) प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबविताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम मशिन हाताळणी, आचारसंहितेची अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, जुन्नर तालुक्यातील निवडणूक कामकाजासाठी नियुक्त असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांपैकी बहुसंख्य शिक्षकांची सात व आठ फेब्रुवारी रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता प्रवेश परीक्षा आहे. मतदानाच्या बदलेल्या तारखेमुळे या शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सध्याची शैक्षणिक क्षेत्रातील परिस्थिती पाहता शिक्षक पात्रता परीक्षा हा शिक्षकांसाठी अनिवार्य घटक झाला आहे. याबाबत प्रशिक्षणस्थळी ज्या शिक्षकांची परीक्षा आहे, असे शिक्षक गेल्यानंतर निवडणूक विभागाच्या यंत्रणेकडून या शिक्षकांची साधी दखल देखील घेतली जात नव्हती, अशी तक्रार परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या शिक्षक वर्गातून केली. तर निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणारी व प्रशिक्षण घेणारी यंत्रणा योग्य पद्धतीने कामकाज करत नसल्याची तक्रार यावेळी बहुसंख्य कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: अर्थसंकल्पाच्या दिवशीच महागाईचा स्फोट! गॅस सिलिंडर महाग, छोट्या उद्योगांना जबर धक्का

Latest Marathi News Union Budget 2026 Live : आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार; सर्वसामान्यांपासून उद्योगजगताचे बजेटकडे लक्ष

Tax-Free Nations : कराच्या स्वरूपात ‘या’ देशांमध्ये जनतेकडून एकही रुपया केला जात नाही वसूल!

मुंबईत आजपासून नवी वाहतूक नियमावली, अवजड वाहनं ते पार्किंगसाठी कडक नियम

Maharashtra Weather Update : फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी वातावरणात बदल, IMD चा इशारा, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT