पुणे

अहिल्यादेवी यांच्याकडून प्रजेचा उत्कर्ष : पाटील

CD

बावडा, ता. १४ : पती, पुत्र, नातू, जावई यांचे मृत्यू समक्ष पाहिले तरी देखील आयुष्यात सतत दुःखाची मालिका सुरू असताना न डगमगता प्रजेचा उत्कर्ष करण्याचे काम अहिल्यादेवींनी केले असल्याचे मत नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उमेश पाटील यांनी व्यक्त केले. बावडा (ता. इंदापूर) येथील किसान सार्वजनिक वाचनालयाच्या हॉलमध्ये वाचनालय व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित अहिल्यादेवी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते.
अध्यक्षपदी शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष महादेव घाडगे हे होते. दरम्यान, सर्वांसाठी आयोजित केलेल्या खुल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत १०० हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत जान्हवी घाडगे हिने प्रथम क्रमांक, प्रतीक होनमाने याने द्वितीय, पृथ्वीराज होनमाने याने तृतीय क्रमांक पटकवला, तर ओंकार पोतदार व हर्षराज घाडगे यांनी उत्तेजनार्थ बक्षीसे जिंकली. यावेळी सुरेश शिंदे, अजित टिळेकर, विक्रांत घोगरे, अशोक चव्हाण, पांडुरंग कांबळे, सतीश कांबळे आदी उपस्थित होते. किसान सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पंडितराव पाटील यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Ultimatum Pakistan: ‘..तर परिणाम वाईट असतील' ; चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा अल्टिमेट!

Manoj Jarange Patil: जरांगे-सरनाईक भेटीत काय चर्चा झाली? मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? स्पष्ट सांगितलं

Latest Marathi News Updates: HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठीची मुदत पुन्हा वाढवली!

Manchar News : साकारमाच-आहुपे गाव पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Supreme Court: मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख लोकांचे नावं जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT