पुणे

मुठा खोऱ्यात दहा हजार वह्यांचे वितरण

CD

भुकूम, ता. १ : खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस मुठा खोऱ्यात दहा हजार वह्यांचे वाटप करून साजरा करण्यात आला. पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांच्यावतीने आंदगाव (ता. मुळशी) येथे वह्या देण्यात आल्या. कोंढरे म्हणाले, ‘‘फ्लेक्सबाजी करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबवून नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आनंद आहे. खासदारांकडून यापूर्वी आंदगाव हायस्कूलला मोठा निधी मिळाला आहे. शैक्षणिक उपक्रम, गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत असे उपक्रम दरवर्षी राबविले जातात. विना अनुदानित शिक्षकांच्या मानधनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.’’
याप्रसंगी कोळावडे, खारवडे, कोंढूर, मुठा व खोऱ्यातील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. आंदगाव हायस्कूलला कोंढरे यांच्याकडून एक हजार व रोटरी क्लब ऑफ कोरेगाव यांच्याकडून अडीच हजार वह्यांचे वाटप केले. यावेळी सरपंच शिवाजी झुंझुरके, उपसरपंच सारिका गुजर, माजी सरपंच कैलास मारणे, प्रफुल्ल मारणे, सारिका वैद्य, लक्ष्मण मरगळे, मुख्याध्यापक एस. सावंत, मंगेश आव्हाड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींवर कडक बंदी लागू करा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश, पर्यावरण-जलस्रोतांवर होतोय परिणाम!

Latest Marathi News Updates : पैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

जिवंत राहुदे पण मृतदेह तरी द्या, मंत्री-नेत्यांमुळे बचावकार्यात अडथळा; मुख्यमंत्र्यांसमोर नातेवाईक संतापले

Gold Rate Today : एका आठवड्यात १८०० रुपयांनी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिरातील वाढती गर्दी वादाचे कारण; दर्शन व्यवस्थेच्या अभावामुळे भाविकांना मारहाण

SCROLL FOR NEXT