पुणे

आधारवड ठरलेल्या दवाखान्यास सरकारी अनास्थेमुळे घरघर

CD

प्रा. प्रशांत चवरे : सकाळ वृत्तसेवा
भिगवण, ता.२१ : सहा गावांचे कार्यक्षेत्र असलेला येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास शासकीय अनास्थेमुळे सध्या घरघर लागली आहे. येथील पशुधन विकास अधिकारीही प्रभारीच आहे. केवळ दीड कायम कर्मचाऱ्यांवरच येथील कारभार कसाबसा सुरू आहे. एकेकाळी आधारवड ठरलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पशुपालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
शासनाने इमारतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे सात लाख रुपयांचा निधी मंजूर केला. परंतु केवळ वरवरच्या मलमपट्टीपेक्षा संपूर्ण इमारतच नव्याने बांधण्याची आवश्यकता आहे. येथील कर्मचारी वसाहतही मोडकळीस आल्यामुळे कर्मचाऱ्यांना बाहेरच राहावे लागते. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था आहे. स्वच्छतागृहाचा अभाव, जनावरे तपासणीसाठी आल्यानंतर जनावरे तसेच जनावरांचे मालक यांच्यासाठी सुविधांची वाणवा आहे.
भिगवण, भिगवण स्टेशन, डिकसळ, तक्रारवाडी, मदनवाडी, भादलवाडी या गावांसाठी श्रेणी-१ चा पशुवैद्यकीय दवाखान्यास मंजूर करण्यात आला. या दवाखान्याच्या माध्यमातून येथील परिसरामध्ये दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन आदी शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात उदयास आले होते. परंतु मागील काही वर्षांपासून शासनाच्या दुर्लक्षामुळे येथील दवाखान्यास घरघर लागली आहे. मागील दोन वर्षांपासून येथील पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. त्याच बरोबर पर्यवेक्षक, व्रणोपचारकाची पदेही रिक्त आहे. सध्या दवाखान्यांमध्ये प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी, एक परिचारक व एक अर्धवेळ स्वच्छता कर्मचारी यांच्यावर येथील कारभारच चालतो.


भिगवण व परिसरामध्ये दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन यासारखे शेतीपूरक व्यवसाय केले जातात. येथील पशुवैद्यकीय दवाखाना मोडकळीस आल्यामुळे परिसरातील पशुपालकांची मोठी अडचण होत आहे. दवाखान्यासाठी सुसज्ज इमारत बांधून अत्याधुनिक सुविधा देण्याची आवश्यकता आहे.
- तुषार हगारे, पशुपालक शेतकरी, भिगवण स्टेशन

भिगवण येथील श्रेणी- १ च्या पशुवैद्यकीय दवाखान्यास सहा गावांचे कार्यक्षेत्र आहे. येथील पूर्णवेळ पशुधन विकास अधिकाऱ्याची जागा रिक्त आहे. त्यामुळे डाळज येथे कार्यरत असलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला आहे. भिगवण व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पशुधन उपलब्ध आहे. सदर ठिकाणी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास पशुपालकांना उत्तम सेवा देता येईल. सध्या परिसरातील सहा दवाखान्यामध्ये मोबाईल व्हॅनच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.
- डॉ. विराज वाघ, प्रभारी पशुधन विकास अधिकारी, भिगवण.

याची आहे गरज:-
- दवाखान्याभोवती संरक्षक भिंत
- पाण्याची टाकी, स्वच्छता गृह व परिसराची स्वच्छता.
- एक्सरे व सोनोग्राफी सुविधा.
- रक्त तपासणी सुविधा

दृष्टिक्षेपातील स्थिती:
- मोडकळीस आलेली इमारत.
- स्वच्छता गृहाचा अभाव
- मोडकळीस आलेली कर्मचारी वसाहत.
- पूर्णवेळ पशुधन विकास अधिकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची गैरसोय
- सुविधांअभावी दवाखान्यात येणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट

परिसरातील पशुधन
शेळी- २९८९
गाई-१६५१
म्हशी- १२३१
मेंढी- ११८३


बैल- १२८


एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ ची स्थिती
कृत्रिम रेतन-------३८६
गर्भधारणा तपासणी-------३६०
वंधत्व निर्मुलन संख्या-------१८७


लसीकरण
लाळ खुरकूत..........२४३७
घटसर्प..........१८५८
लंपी..........१२३५
ईटीव्ही..........७६०
फऱ्या..........२८५
रेबीज..........५o

परिसरात आढळणारे प्रमुख रोग:–
लंपी, लाळ खुरकूत

दवाखान्यातील रिक्त पदे:-
पशुधन विकास अधिकारी-------१
पर्यवेक्षक-------०१
व्रणोपचारक-------०१

01296

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana - Palash Muchhal: स्मृती-पलाशच्या लग्नात विघ्न! वडिलांना हृदयविकाराचा झटका, विवाहसोहळा रद्द

Solapur Police : पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यावरील गुन्हा रद्दबातल; मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूरचा निर्णय!

महिन्याभरापूर्वी लग्न, पण महिला दीड महिन्यांची गर्भवती; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण...

Weekly Horoscope Prediction : ह्या आठवड्यात 'या' मूलांकाच्या लोकांना मिळणार यश तर 'या' मूलांकाला आहे धोका !

Pankaja Munde PA Anant Garje Wife Gauri Garje यांनी उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबियांना घातपाताचा संशय

SCROLL FOR NEXT