पुणे

भिगवणमधील गलांडे यांच्या हस्ते रोहित शर्माला पारितोषिक

CD

भिगवण, ता. ७ : विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील अष्टपैलू खेळाडू रोहित शर्मा याला पारितोषिक देण्याचा मान भिगवण (ता. इंदापूर) येथील श्रीकांत हनुमंत गलांडे यांना मिळाला आहे. ग्रामीण भागातील गलांडे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
येथील गलांडे हे एस.बी.आय. लाइफ इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. त्यांनी कंपनीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारत व दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील खेळाडूस पुरस्कार देण्यासाठी त्यांची निवड केली होती. या सामन्यांमध्ये रोहित शर्मा याची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड केली होती. रोहित शर्मा याला रोहित शर्मा याला गलांडे यांचे हस्ते ट्रॉफी व धनादेश देण्यात आला
जिद्द व चिकाटीच्या जोरावर गलांडे यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत बोलताना गलांडे म्हणाले की, ‘‘एखादी क्रिकेटची मॅच पहावी एवढेच स्वप्न होते. मात्र, व्यवसायांमध्ये सातत्यपूर्ण केलेल्या कामगिरीमुळे रोहित शर्मा सारख्या महान खेळाडूस पारितोषिक देण्याची संधी मिळाली ही मोठी आनंदाची बाब आहे.’’

01304

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

Solapur News : लग्नास नकारानंतर तरुणाने संपविले जीवन; मुलीला समोर बसून विचारण्याची केली होती विनवणी

T20 World Cup: अमेरिकेविरुद्ध संकटमोचक ठरलेल्या कर्णधार सू्र्यकुमारचा मोठा विक्रम; विराट कोहली, बाबर आझमला टाकलं मागे

Karad News : हिंदकेसरी संतोष वेताळ समर्थकाना जाम कॉन्फीडन्स; निकाल जाहीर होण्यापुर्वीच उधळला गुलाल

Giant Wheel Collapse : जत्रेतील 'झुला' कोसळल्याने भीषण दुर्घटना!, अनेकजण गंभीर जखमी, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT