पुणे

आमदार थोपटे आंदोलनावर ठाम

CD

भोर, ता. ७ : ‘‘मतदानापूर्वी मतदारांनी पैसे वाटल्याच्या तक्रारीवर पोलिसांनी रीतसर गुन्हा दाखल करून कारवाई केली नाही, तर आम्ही पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्यास ठाम आहे,’’ असे महाविकास आघाडीच्यावतीने आमदार संग्राम थोपटे यांनी पुन्हा एकदा शुक्रवारी (ता. ७) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले. तसेच, महायुतीच्यावतीने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी केलेल्या आरोपांचे खंडनही केले.
आमदार थोपटे म्हणाले, ‘‘महायुतीच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर राजकीय स्टंटबाजी करण्याचा आरोप केला. हे त्यांचे अज्ञान असून, ते राजकीयदृष्ट्या अपरिपक्व आहेत. मूळ मुद्दा बाजूला ठेवून ते भोर शहरातील अवैध धंद्याबद्दल आणि बांधकामाबद्दल बोलत आहेत. आम्ही कोणत्याही अवैध व्यवसायाला पाठीशी घालत नाही. तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात खासदार सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे ते वरिष्ठांना आपले राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी चिखलफेक करीत आहेत. पोलिसांनी मावळ तालुक्यातील गाड्या भोरमध्ये कशासाठी आल्या? कुठे थांबल्या आणि त्यांनी कोणाकोणाला फोन केले? याची चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे.’’
‘‘भोरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक यशवंत डाळ यांनी शहरात अवैध बांधकामे केलेली आहेत. त्यांना नगरपालिका प्रशासनाने नोटीसही दिलेली आहे. परंतु, तेच आता अवैध बांधकामावर बोलून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत आहेत,’’ असे आमदार थोपटे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, मानसिंग धुमाळ, विठ्ठल शिंदे, संदीप नांगरे, विठ्ठल आवाळे, बाळासाहेब थोपटे, सचिन हर्णसकर, गणेश पवार, समीर सागळे, सुमंत शेटे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : 'पीडितेने जबाब बदलला तरीही...' मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला हायकोर्टाचा मोठा झटका

Umred Crime : दुहेरी हत्याकांडाने उमरेड शहर हादरले; शेजाऱ्याकडून माय-लेकीची हत्या, परिसरात भीतीचे वातावरण

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये महाविकास आघाडीला सुरुंग; जागावाटपाच्या वादातून काँग्रेस-राष्ट्रवादी बाहेर?

DRDO Recruitment 2025: मोठी बातमी! DRDO मध्ये 764 पदांसाठी भरती सुरू; अर्ज कुठे आणि कसा करायचा?

Latest Marathi News Live Update: संविधान आणि लोकशाही धोक्यात- मल्लिकार्जून खर्गे

SCROLL FOR NEXT