पुणे

पांगरीतील २० विद्यार्थ्यांना विषाणूजन्य आजाराने त्रास

CD

भोर, ता. १६ : भाटघर धरण खोऱ्यातील पांगारी येथील शासकीय आश्रम शाळेतील २० विद्यार्थ्यांना डोकेदुखी, थंडी, ताप, सर्दी, खोकला व उलट्यांचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यामध्ये १५ विद्यार्थी आणि ५ विद्यार्थिनींचा समावेश आहे.

खराब वातावरणामुळे मागील तीन- चार दिवसांपासून आश्रमशाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना डोकेदुखी, थंडी, ताप, सर्दी, खोकला व उलट्यांचा त्रास सुरु झाला. पांगारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, काही विद्यार्थ्यांना अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे मुख्याध्यापक श्रीकृष्ण दहिफळे यांनी शनिवारी (ता. १६) सकाळी काही विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णवाहिकेतून आणि काहींना स्वतःच्या मोटारीतून भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष खामकर यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले आणि इतरांवर उपचार करून पाठविले.
मुसळधार पावसानंतर मागील तीन- चार दिवसांत उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे विषाणूजन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे पांगारीच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना हे संसर्गजन्य आजार झाले असल्याची शक्यता उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत साबणे यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठिक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वातावरणातील ऊन-पावसाच्या बदलामुळे विषाणूजन्य आजारात वाढ होत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. हे आजार संसर्गजन्य असल्यामुळे आजारी रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी न जाता घरात आराम करावा. पाणी उकळून प्यावे, तोंडाला मास्क लावावा आणि थंडी- ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी व अंगदुखी जाणविल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.
- डॉ अनंत साबणे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, भोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

Thane Traffic: ठाणेकरांच्या उत्साहाला कोंडीचे ग्रहण, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्गावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT