पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव पुरस्कार जाहीर

CD

भोर, ता. २६ : येथील फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुण्यातील ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते वसंत साळवे यांना राष्ट्रीय पातळीवरचा तर भोरमधील वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले डॉ. प्रदीप पाटील यांना तालुकास्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव यांनी दिली.
सन्मानपत्र व सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असून डिसेंबर महिन्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारासाठी रोख रक्कम २५ हजार रुपये सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे तर तालुकास्तरीय पुरस्कारासाठी रुपये १० हजार रुपये आणि सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. वसंत साळवे यांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाड्या वस्त्यांवर जाऊन निःस्वार्थ भावनेने काम केलेले आहे. चळवळीत काम करत असताना त्यांनी केलेले विविध मोर्चे, आंदोलने, उपोषण, लॉंगमार्च आणि धरणे आंदोलने यामुळे त्यांच्या कामाची महती वाढलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असताना शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. डॉ प्रदीप पाटील हे वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध सेवाव्रती असून नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. संत साहित्य व फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा यांच्या समन्वयातून समाजप्रबोधनाची मोहीम गेल्या अनेक वर्षांपासून ते राबवीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: भारतीय कर्णधारावर ICC ने कारवाई केली, BCCI ची सटकली! थोपटले दंड, प्रकरण आता आणखी तापणार...

Visa Free Countries: व्हिसा फ्री प्रवास करायचा आहे? या ५८ देशांमध्ये फिरा एकदम बिनधास्त, मिळवा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

आलाय 'टीजर' व्हा 'हजर'..!! ‘वेल डन आई’ची प्रेक्षकांना उत्सुकता; विशाखा सुभेदार दिसणार हटके भूमिकेत

Kolhapur News : पूरग्रस्तांसाठी आमदार अमल महाडिक यांचा मदतीचा हात! स्वखर्चातून दिले १५०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य

IND vs SL Live: जसप्रीत बुमराहसह अष्टपैलू खेळाडूला विश्रांती; दोन बदलांसह टीम इंडिया श्रीलंकेचा सामना करणार

SCROLL FOR NEXT