पुणे

झेडूंच्या फुलांनी सजली भोर शहरातील बाजारपेठ

CD

भोर, ता. २० : भोरची बाजारपेठ लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असलेल्या झेंडूच्या फुलांनी सजली. शहरातील चौपाटी परिसरात सोमवारी (ता. २०) सकाळपासूनच फुले विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला दुकाने थाटली. चौकटी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या तीन बाजूंच्या रस्त्यांवर शेतकरी आणि व्यावसायिकांनी फुले विक्रीस सुरुवात केली. फुलांचे ढीग लावून १०० पेक्षा अधिक विक्रेत्यांनी विक्री सुरू केली. तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी ही शेतातील झेंडूची फुले विक्रीसाठी आणली. बाजारपेठेत फुले मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली तरीही झेंडूच्या फुलांचे बाजारभाव कमी झाले नाहीत. लाल आणि पिवळ्या झेंडूंचा भाव हा प्रतिकिलोसाठी ७० रुपयांपासून सुरू झाला. झेंडूची ताजे फुले सुमारे १०० रुपये प्रतिकिलोने विकली गेली.
शहरातील चौपाटी परिसरात सर्वाधिक फुले विक्रेते बसले होते. याशिवाय शिवाजी पुतळा रोड, नगरपालिका चौक, मंगळवार पेठ आणि एसटी स्टँड जवळ स्थानिक शेतकरी व व्यावसायिक यांनी फुलांच्या विक्रीची दुकाने थाटली. झेंडूच्या फुलांबरोबर लहान मुलांनी बनवलेल्या किल्ल्यांवर ठेवण्यासाठी आवश्यक असलेली मातीची चित्रे ही विक्रीसाठी ठेवण्यात आली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, घोडे, विविध प्रकारची झाडे आणि इतर वस्तूंचा समावेश आहे.


06026

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: 352 वर्षांपूर्वी रायगड कसा होता? पहिल्यांदा जगासमोर 3D मॅपिंग! शिवरायांचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की पाहा

नोट्स आणि मार्क वाढवून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार; रूममध्ये नेत जबरदस्तीने शारीरिक संबंध...

CM Yogi Adityanath: यूपी होमगार्ड स्थापना दिवस: सीएम योगींकडून जवानांचे कौतुक; भत्त्यांत वाढ आणि आरोग्य योजनेचे आश्वासन

Pune Special Trains: विमान प्रवाशांच्या मदतीला रेल्वे; बंगळूर दिल्लीसाठी विशेष गाड्या, गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न

कलमुरुडेश्वर मठाजवळ काँग्रेस ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या; आरोपी बजरंग दलाशी संबंधित, दोन गटांत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT