पुणे

भरिताचं काळं वांग ठरलं सोनवणे कुटुंबीयांसाठी ‘सोनं’

CD

भोर, ता. ५ : न्हावी सर्वे नंबर १५ (ता. भोर) येथील शेतकरी राजेंद्र महादेव सोनवणे यांनी एक एकरमध्ये काळ्या वांग्याचे (भरीत वांगे) ३० टन उत्पादन घेतले व १० लाखांचा नफा मिळवला. सोनवणे वांग्याचे हे पीक तीन वर्षांपासून घेत आहेत. यंदा त्यांना विक्रमी नफा असून गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी ३० टन वांग्यांची विक्री केलेली आहे. आजपर्यंत यांना १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. वांग्यामुळे भरभराट झाल्याची भावना सोनवणे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

राजेंद्र सोनवणे यांनी इंझा कंपनीचे बारटोक जातीचे वांग्याचे बियाणे विकत घेतले. १ हजार बियाणे असलेली एक पुडी साडेचार हजार रुपयांना खरेदी केली. एकूण तीन पुड्यांमधील तीन हजार बियाणांसाठी सुमारे १५ हजार रुपये खर्च केला. नर्सरीमध्ये या बियाणांपासून रोपे बनविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी प्रत्येक रोपासाठी एक रुपया २० पैसे दिले.

मार्चपर्यंत राहणार तोडणी सुरू
औषध फवारणीसाठी इकोला अॅग्रो कंपनीचे अर्जुन शिंदे यांनी सहकार्य केले. बियाणांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शेतावर येऊन पाहणी केली. ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत आतापर्यंत वांग्याचे १६ तोडे झाले आहेत. आतापर्यंत ३० टन वांग्याचे उत्पादन झालेले आहे. अजूनही वांग्याचा तोडा सुरू आहे. मार्च महिन्यापर्यंत या वांग्याचे तोडे सुरू राहणार आहेत. राजेंद्र सोनवणे हे पत्नी पूनम आणि आई-वडिलांसह शेतीची देखभाल करीत आहेत. वांग्याची तोड करण्यासाठी ते मजुरांची मदत घेतात.


अशी केली वांग्याची लागवड
१. बेडवर निंबोळी पेंड, वसल डोस आणि कोंबडी खताच्या ५० बॅग टाकल्या.
२. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात मलचिंग पेपर टाकून पाच बाय तीन अंतरावर रोपांची लागवड
३. दोन महिन्यानंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात वांग्याच्या तोड्यास सुरुवात झाली.

१६ तोडे....चार महिने
१ लाख ९० हजार रुपये......औषध फवारणी
१५ हजार.....तीन हजार बियाणे

वांग्याची बियाणे दिलेली कंपनी आणि फवारणी करण्यासाठी औषधांची कंपनी यांच्या मार्गदर्शनानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतीची मशागत केली. यामुळे आतापर्यंत ३० टन वांग्याचे उत्पादन मिळाले आहे. यासाठी माझी पत्नी पूनम आणि आई-वडील यांची साथ लाभली आहे.
- राजेंद्र सोनवणे, शेतकरी.

06394, 06395, 06396

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईत मोठी पाईपलाईन दुरुस्ती; 'या' दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार, पण कोणत्या भागात? वाचा यादी...

Space Station on Earth : भारत बनवत आहे स्वतःचे अंतराळ स्थानक; फक्त 4 वर्षांत पृथ्वीवर येणार स्पेस स्टेशन; अगोदर होता फक्त चीनचा दबदबा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील महापौर बंगल्याचं नूतनीकरणाच काम अंतिम टप्प्यात

HSRP Number Plate न बसवल्यास वाहनधारकांच्या खिशाला लागणार मोठी कात्री ! दररोज १००० रुपये दंड अन्...

धुरंधर २ मध्ये यामी गौतमची दमदार भूमिका, अ‍ॅक्शन रोलमध्ये दिसणार

SCROLL FOR NEXT