पुणे

भोरमधील पहिला निकाल सकाळी अकराला येणार

CD

भोर, ता. ८ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या शनिवारी (ता. ७) झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी (ता. ९) येथील सरदार येसाजी कंक औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात होणार आहे. प्रशासनाने मतमोजणीसाठीची सर्व पूर्ण केली असून, रविवारी (ता. ८) सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. मतमोजणीसाठी २० टेबल ठेवण्यात आले आहेत. सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून, प्रथम टपाली मतदानाची मोजणी होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वेळू- नसरापूर गटाच्या मतमोजणीस सुरुवात होणार आहे. सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान पंचायत समितीच्या वेळू गणाचा पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात म्हणजे साडेअकरा वाजता वेळू गटाचा आणि नसरापूर गणाचा निकाल हाती येईल. त्यानंतर भोंगवली- कामथडी, भोलावडे- शिंद आणि शेवटी उत्रौली- कारी गट, या क्रमाने मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या एकून १३ फेऱ्या होणार असून, सर्वाधिक ४ फेऱ्या या भोलावडे- शिंद या गटासाठी आहेत. उर्वरित तीन गटांची मतमोजणी ही प्रत्येकी ३ फेऱ्यांमध्ये होणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात आणि साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र नजन यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सलमान खानची RSS च्या कार्यक्रमाला हजेरी, एका कृतीमुळे वेधलं सगळ्यांचं लक्ष, viral video

Accident: गाडीला पोलिसांची नेमप्लेट, चालक मद्यधुंद अवस्थेत, अनेक वाहनांना उडवलं अन्...; नवी मुंबईतील थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ची नवी रिलीज डेट जाहीर, आता 'या' तारखेला होणार प्रदर्शित !

Latest Marathi News Live Update : टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी कोलकाता विमानतळावर दाखल

Chocolate Day 2026: 'चॉकलेट डे' ला गोड सरप्राईज! घरीच तयार करा चवदार चॉकलेट केक, पाहा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT