baramati st stand esakal
पुणे

Baramati ST Stand: ५० कोटी खर्च करून बनवलं विमानतळासारखे एसटी स्टँड पण... बारामतीमध्ये परिवहन मंडळाचे आर्थिक नुकसान

ST Pariwan Mahamandal: बारामतीत सुमारे ५० कोटी रुपये खर्च करून अद्ययावत बसस्थानक उभारले गेले. दोन मार्च रोजी या बसस्थानकाचे उद्‍घाटन झाले. परंतु जुलै महिना संपूनही बारामती आगाराचे कामकाज अजूनही एमआयडीसी आगारातूनच चालविले जात आहे.

CD

बारामती, ता. ३१ : शहरात सुमारे ५० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या बसस्थानकातील आगार व इतर मूलभूत सुविधा कार्यान्वित होत नसल्याने राज्य परिवहन महामंडळाचे आर्थिक नुकसान होत असून प्रवाशांनाही याचा फटका बसत आहे. बसस्थानक असले तरी आगार म्हणून वापर होत नसल्याचे समोर आले आहे.

बारामतीत सुमारे ५० कोटी रुपये खर्च करून अद्ययावत बसस्थानक उभारले गेले. दोन मार्च रोजी या बसस्थानकाचे उद्‍घाटन झाले. परंतु जुलै महिना संपूनही बारामती आगाराचे कामकाज अजूनही एमआयडीसी आगारातूनच चालविले जात आहे. अत्यंत सुसज्ज जागा उपलब्ध करूनही बारामतीपासून सात किलोमीटर अंतरावरील एमआयडीसी आगारात बारामती आगाराच्या बसेस रात्री पार्किंगसाठी नेल्या जातात.

दररोज चौदा किलोमीटर अंतराचे डिझेल यात खर्ची पडत आहे. बारामती आगाराच्या ८४ बसेसचा दररोजचा हिशेब केला तर यात हजारो रुपये दर दिवशी खर्ची पडतात. शिवाय एमआयडीसीमधून गाडी बारामती बसस्थानकावर येतानाही अनेकदा उशीर होतो, त्याचा फटका प्रवाशांना बसतो.

उद्‍घाटनानंतर पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप डिझेल व सीएनजी पंप कार्यान्वित झालेला नाही. इंधन भरायलाही बसेसला एमआयडीसीत जावे लागते. त्यातही वेळ वाया जातो. या बसस्थानकावर नव्याने ४३ गाळे बांधले आहेत. पूर्वीच्या बसस्थानकावर असलेल्या नऊ व्यावसायिकांपैकी पाच जणांना जागा देण्यात आली असून उर्वरित गाळे गेले पाच महिने बंद अवस्थेत आहेत. याचे लिलावच होत नसल्याने परिवहन मंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे.

बसस्थानक उभारण्यास दोन वर्षांचा कालावधी गेला या काळात या स्थानकावर ४३ गाळे उभारले जाणार याची माहिती असूनही त्या काळात लिलावप्रक्रीयेबाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत. या बसस्थानकावर उभारण्यात आलेल्या चालक-वाहक विश्रांती कक्षाचाही वापर अद्याप सुरू झालेला नसल्याने त्याचाही उपयोग होत नाही. मुक्कामासाठी असलेल्या गाड्याच्या चालक वाहकांना येथे उत्तम सोय दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT