पुणे

बारामतीत सेवा रस्त्यांच्या डांबरीकरणाची मागणी

CD

बारामती, ता. ३० : शहरातील अनेक रस्त्यांच्या डांबरीकरणाची गरज निर्माण झाली असून, नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याची मागणी नागरिक व प्रवाशांकडून होत आहे.
मॉन्सूनपूर्व व मॉन्सूनच्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी चाऱ्या खोदल्याने, नळदुरुस्तीची कामे केल्याने, तर काही ठिकाणी सुशोभीकरणाच्या कामानंतरची दुरुस्ती शिल्लक असल्याने रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. भिगवण रस्त्यालगत समांतर असलेल्या सेवा रस्त्याची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. वळणावर आणि जिथे गतिरोधक करण्यात आले आहेत, त्या ठिकाणी डांबरीकरणाची गरज आहे. काही ठिकाणी नव्याने दुचाकी वाहने चालवण्यासाठी केलेली जागा उंच व रस्ता खाली असल्याने दुचाकी त्या ठिकाणी लावताना हिसके बसतात. गतिरोधकांच्या दोन्ही बाजूला थोडासा पाऊस झाला की पाण्याची तळी साचतात, त्या ठिकाणीही पाणी वाहून जाण्यासाठी सोय करण्याची गरज आहे.
काही ठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आले होते. त्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडलेले असून, तेथेही डागडुजीची गरज निर्माण झाली आहे. पावसाने उघडीप दिलेली असल्याने ही कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी बारामतीकरांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : ''पापाची हंडी आधीच फोडलीये, आता BMC मध्ये विकासाची हंडी लागेल अन् लोणी…; फडणवीस काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : नाशिकध्ये मनसेचा राडा परप्रांतीयांना दिला चोप

अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी! भूषण पाटीलच्या 'कढीपत्ता' चित्रपटात दिसणार अनोखी प्रेमकहाणी

फेक सॅलरी स्लीपवर नोकरी मिळाली, पण काम येईना; बॉस तरुणीने बँक स्टेटमेंट मागताच...; काय घडलं?

IPL 2026: CSK बॅकफूटवर, संजू सॅमसनसाठी आयपीएल विजेता संघ उतरला मैदानात; दोन स्फोटक खेळाडूंना RR ला देण्याची तयारी

SCROLL FOR NEXT