पुणे

बारामतीत नीरा डावा कालव्याच्या सुशोभिकरणाने वैभवात भर

CD

अजित पवारांच्या दूरदृष्टीने बदलला बारामतीचा चेहरामोहरा

आपल्या राजकीय जीवनाच्या प्रवासास प्रारंभ केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही गोष्टींवर जाणीवपूर्वक भर दिला. ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या पाण्यावर अजित पवार यांचे सुरुवातीपासूनच बारीक लक्ष होते. त्यामुळेच पाण्याशी संबंध असलेला पाटबंधारे विभाग हा त्यांच्या आवडीचा विषय होता. प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभाग हा महत्त्वाचा असतो, कारण पिकांच्या दृष्टीने पाणी वेळेत मिळणे हे सर्वात महत्त्वाचे असते. बळिराजाच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अजित पवार यांनी सुरुवातीपासूनच पाटबंधारे विभागाला अधिकचे महत्त्व दिले होते.

बारामती तालुक्यामध्ये नीरा डावा कालवा हा सर्वात महत्त्वाचा समजला जातो. या कालव्यामुळे तालुक्यातील १३७८० हेक्टर शेतीचे सिंचन होते. या कालव्याचे आवर्तन व इतर बाबींबाबत अजित पवार कायम बारकाईने लक्ष ठेवून असतात. कालवा सल्लागार समितीची बैठक असो व पाटबंधारे विभागाच्या प्रत्येक विषयाच्या संदर्भात ते प्राधान्याने वेळ देत समस्या सोडवण्याचा प्रयत्न कायमच करतात.

विश्रामगृहांचे झाले नूतनीकरण
बारामती शहरातील पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह सन १८८७ मध्ये उभारण्यात आले होते. त्याची अवस्था मधल्या काळात दयनीय झाली होती. त्यामुळे या विश्रामगृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आणि त्याचे काम सुरू झाले. यामध्ये जुने विश्रामगृह दुरुस्तीसह अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी जुन्या ब्रिटिशकालीन विश्रामगृहाचा जीर्णोद्धार करून ते अतिशय सुंदर रीतीने अजित पवार यांच्या पुढाकारातून तयार झाले आहे. जुन्या विश्रामगृहाच्या वैभवशाली खुणा कायम ठेवून इमारतींची डागडुजी कशी करावी याचे व्हीजन अजित पवार यांच्याकडे असल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या ब्रिटिशकालीन विश्रामगृहाचा आराखडा कायम ठेवत त्यांनी या विश्रामगृहाचे नूतनीकरण केले. मुळातच निसर्गरम्य परिसर दाट झाडी यामुळे हे विश्रामगृह कायमच येणाऱ्या पाहुण्यांच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय असतो. ब्रिटिशकालीन विश्रामगृहांमध्ये सर्व सुखसोई निर्माण करून अत्याधुनिक व सुसज्ज विश्रामगृह बारामतीत उभे राहिले आहे.

भोजनगृहाच्या कामालाही प्रारंभ होणार
पाटबंधारे वसाहतीतील नवीन विश्रामगृह परिसरात नव्याने भोजनगृह उभारण्याच्या कामालादेखील आता सुरुवात होत आहे. बारामती आता विभागाचे ठिकाण असल्यामुळे, तसेच महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींची मोठी वर्दळ सातत्याने असते, या पार्श्वभूमीवर विश्रामगृह सुसज्ज असणे व त्याला लागून भोजनगृह असणे ही एक शहराची गरज होती. पाटबंधारे विभागाच्या पुढाकारातून ही गरज या निमित्ताने पूर्ण होत आहे. नवीन बांधकाम करणे, बांधकाम दुरुस्ती करणे, विद्युतीकरण, पाणीपुरवठा, पाण्याची टाकी, गटार वाहिनी, संरक्षक भिंत, फर्निचर लँडस्कॅपिंग, पेव्हर ब्लॉक बसवणे अशी विविध कामे या निमित्ताने करण्यात येत आहेत.

नीरा डावा कालव्याचे सुशोभीकरण
शहरातून वाहणाऱ्या नीरा डावा कालव्याचे बांधकाम ब्रिटिशकालीन आहे. सुमारे १२५ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दुष्काळाच्या काळात हाताला रोजगार मिळावा या उद्देशाने नीरा डावा कालव्याची निर्मिती ब्रिटिशांनी केली होती. वीर धरण ते शेटफळपर्यंत या कालव्याची लांबी १५८ किलोमीटर इतकी आहे. बारामती व इंदापूर तालुक्यातील जमीन या कालव्याच्या ओलिताखाली येते. कालव्याचे पूर्ण बांधकाम हे मातीचे असल्याने गेल्या अनेक वर्षात गाळ साचून, तसेच इतर बाबींमुळे कालव्याची वहनक्षमता कमी झाली होती. कालवा मातीचा असल्याने, काम होऊन अनेक वर्षांचा कालावधी झाल्याने शहराच्या हद्दीत कालवा फुटू नये व पाण्याचा पाझर होऊन पाणी वाया जाऊ नये, या उद्देशाने कालव्याचे अस्तरीकरण करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या वतीने घेण्यात आला होता.

वहन क्षमता वाढली, दलदल कमी झाली
वीर धरणातून नीरा डावा कालव्यात पाणी येताना ८५० क्युसेक वेगाने हे पाणी सोडले जाते. आता हाच वेग काम झाल्यानंतर १२५० क्युसेकपर्यंत वाढला आहे. या कालव्यावर १८ जलसेतू असून, त्यापैकी ११ जलसेतूंची क्षमतावृद्धी केली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या पुढाकारातून केवळ अस्तरीकरणापुरता हा विषय मर्यादित न ठेवता, नीरा डावा कालव्याच्या दोन्ही बाजूला परदेशाच्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याचा निर्णय पवार यांनी घेतला. हे काम त्यांनी प्रत्यक्षात करून दाखविले आहे. आज बारामती शहरात नीरा डावा कालव्याच्या दोन्ही बाजूला अतिशय सुंदर असे सुशोभीकरण केले असून, बारामतीकरांना चार क्षण विरंगुळा मिळावा या दृष्टिकोनातून या सुशोभीकरणाचा उपयोग होत आहे.
नीरा डावा कालव्याच्या बाजूला बारामती शहरात अनेक ठिकाणी अनेक वर्ष पाणी साचून दलदल निर्माण झाली होती. त्याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. अस्तरीकरणाचा निर्णय झाल्यानंतर गळती थांबून दलदल नष्ट झाली, त्याचा बारामतीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कालव्याच्या बाजूला अनेक ठिकाणी वॉकिंग व जॉगिंग ट्रॅक तयार केले आहेत. सोळा ठिकाणी विरंगुळा केंद्र तयार झाली आहेत. लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात आली असून, काही ठिकाणी ओपन व्यायामशाळा उभारण्यात आल्या आहेत. दररोज सकाळी व संध्याकाळी नागरिक कालव्याच्या भरावावरून व्यायाम करताना दिसतात. अनेक ठिकाणी सुंदर फुले असणारी झाडे लावण्यात आली आहेत. काही ठिकाणी सुंदर दिव्यांची रचना व चार क्षण बसण्यासाठी व्यवस्था केली आहे. यामुळे कालवा परिसर अतिशय स्वच्छ व सुंदर दिसत आहे.
मेसर्स देसाई इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम अतिशय उत्तम पद्धतीने केले आहे. त्यामुळे बारामती शहराचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत झाली आहे. एखाद्या नेतृत्वाने इच्छाशक्ती दाखवून निर्णय घेत काम करण्याची तयारी दाखवली तर काय परिवर्तन घडू शकते याचा बारामतीतील अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांकडे बघून प्रत्यय येतो

कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे नूतनीकरण
बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीवरील फोंडवाडा, जळगाव कडेपठार, जळगाव सुपे, नेपतवळण, कऱ्हावागज, मेडद व गुनवडी या सात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची विशेष दुरुस्ती करण्याचा निर्णयही अजित पवार यांनी घेतला. पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नदीवरील या सर्व बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा फटका या परिसरातील शेतकऱ्यांना बसत होता. ही बाब विचारात घेत अजित पवार यांनी तातडीने या सर्व बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. यात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे पारंपरिक बर्गे बसवण्याची यंत्रणा बदलून त्या ठिकाणी यांत्रिकी पद्धतीने संचलित होणारे गेट बसविण्याचा महत्त्वाचा निर्णय पवार यांनी घेतला आहे. त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. या कामाच्या पूर्ततेनंतर पूर नियंत्रणामध्येही सुसूत्रता होऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येणार आहे.
कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये बर्गे काढणे व टाकणे, तसेच नवीन बर्गे बसवण्यासाठीच्या खर्चातदेखील यामुळे कपात शक्य होणार आहे. या नवीन अत्याधुनिक यांत्रिकी पद्धतीने संचलित होणारे गेट बसविल्यामुळे त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना कायमस्वरूपी होणार आहे. अजित पवार यांच्याकडे जी दूरदृष्टी आहे त्याचाच परिपाक या निर्णयामध्ये दिसून येतो.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हणमंत गुणाले, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, बारामती विभागाचे सहायक अभियंता विजय नलावडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या सर्व कामातील परिश्रम हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरतात. आपल्या नियमित कामाव्यतिरिक्त देखील अतिरिक्त वेळ काम करून हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्वच पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे परिश्रम उल्लेख करण्याजोगे आहेत.
अजित पवार यांनी हे निर्णय घेताना जी तत्परता दाखवली, तीच तत्परता पाटबंधारे विभागाच्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे प्रकल्प पूर्णत्वास नेताना दाखवली. त्यामुळे आज बारामती शहरातून वाहणारा नीर डावा कालवा असो किंवा कोल्हापूर पद्धतीच्या बंधारे दुरुस्तीचा विषय असो किंवा विश्रामगृह नूतनीकरणाचा विषय असो या सर्वच बाबतीत एक वेगळा ठसा या निमित्ताने उमटला आहे.

विहंगम दृश्य दिसते
बारामती शहरातील तीन हत्ती चौकामध्ये उभे राहिल्यानंतर परकाळे बंगल्यापर्यंत नीरा डावा कालवा अखंड दिसतो. त्याच्या दोन्ही बाजूला केलेले सुशोभीकरण, पथदिव्यांची आरास व जोडूनच असलेले क्लॉक टॉवर, रात्रीच्या वेळेस कालव्याच्या पाण्यात परावर्तित होणारे दिव्यांचे रूप, पहाटे उगवता सूर्य व सायंकाळच्या वेळेस संधिप्रकाशात कालव्याच्या पाण्यावर आकाशातील रंगांच्या पडणाऱ्या छटा, हे सर्व दृश्य अतिशय विहंगम व विलोभनीय असते.
अनेक नागरिक आपल्या मोबाईलच्या कॅमेरात हे दृश्य चित्रित करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. नीरा डावा कालव्याला लागूनच नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने कलाकार कट्टा आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. या निमित्ताने बारामती शहरातील अनेक कलाकारांना कालव्याच्या बाजूला आपल्या कला सादर करण्यास वाव मिळत आहे. बारामती शहराच्या सांस्कृतिक वैभवात यानिमित्ताने भर पडली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor injured: प्रशांत किशोर यांना रॅलीदरम्यान मोठी दुखापत; पाटणामधील रूग्णालयात उपचार सुरू!

Shocking! अनेकांसोबत शारीरिक संबंध; १०० कोटी उकळले, 'ती' महिला नेमकी कोण? धक्कादायक सत्य समोर

Pahalgam attack: 'टीआरएफ'चा जागतिक दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश; भारताकडून निर्णयाचं स्वागत

Raj Thackeray Warning Nishikant Dubey: ‘’दुबे तुम मुंबई मै आजाओ.., समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें...’’ ; राज ठाकरेंचा कडक पलटवार!

Sangli Poisoning : कर्जबाजारी कुटुंबाने उचलेले टोकाचे पाऊल! विषप्राशनाने सासू-सुनेचा मृत्यू, वडीलांसह मुलाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT