पुणे

काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणारा नेता

CD

उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या राजकीय नकाशावरील वलयाकिंत व्यक्तिमत्त्व आहे. निष्ठावंत, स्वाभिमानी कार्यकर्त्याला संधी देणारा नेता, अशी अजितदादांची ओळख आहे. विकासकामांसाठी निधी देतानाचे दातृत्व, सर्वसमावेशक नेतृत्व, अंगभूत वैशिष्ट्यांच्या बळावर आतापर्यंत ठळकपणे
दिसणारे कर्तृत्व, अशी प्रतिमा अजितदादांनी पुरोगामी महाराष्ट्रात निर्माण केली आहे. विकासकामांतून त्यांनी राज्यातील सर्व घटकांचा परीघ व्यापून टाकला आहे. शेकडो कार्यकर्त्यांच्या आयुष्याचे सोनं करणारे दादा हे दादा माणूस आहेत. अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी माझ्या आयुष्याचा जीवनपटच बदलून टाकला आहे.
-जय पाटील, शहराध्यक्ष, बारामती. राष्ट्रवादी कॉंग्रेस, अजित पवार गट.

पुरोगामी आणि समृद्ध, देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राचे सहावेळा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कामाची शैली अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अजितदादा नेहमीच कामाची संधी देतात. याची अनेक उदाहरणे राज्यभर आहेत. मी देखील त्याचाच एक भाग आहे.
बारामती शहरालगत असलेल्या तांदुळवाडी त्यावेळची ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीचा मी वयाच्या २१ व्या वर्षी सरपंच झालो. सरपंच झाल्यानंतर
मी अजितदादा यांना भेटण्यासाठी गेलो. वयाचे २१ व्या वर्षी सरपंच झालो असल्याने अजितदादा यांनी माझ्याकडे विशेष कौतुकाने पाहिले. तांदुळवाडी गावच्या विकासासाठी मदतीचे आश्वासन देत त्यांनी विकासकामांना भरीव निधी दिला. कामाची गोडधोड सुरू असतानाच तरुणांचे संघटन बांधले. त्यानंतर अजितदादा यांनी माझी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नेमणूक केली. त्यामुळे काम करण्याचा उत्साह आणखीच दुणावला.
तांदुळवाडी गाव २०१२ मध्ये बारामती नगरपरिषदेत समाविष्ट झाले. त्यानंतर जवळपास २५ हजार मतदार संख्या असणाऱ्या वाढीव हद्द क्षेत्रातून नगरसेवक
पदाची संधी अजितदादा यांनी मला दिली. गावपातळीवरून थेट नगरपरिषदेत काम करण्याची संधी मला मिळाल्याने कामाचा झपाटा सुरू झाला. विकासकामांचा परीघ विस्तारत गेला. नगर परिषद हत्तवाड क्षेत्रातील विकास करणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊन अजितदादा यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे तांदूळवाडी परिसराचा कायापालट झाला.
तांदूळवाडी परिसरात विविध विकासकामे मार्गी लागली. त्यानंतर नगरपरिषदेत आरोग्य सभापतीपदी माझी निवड करण्यात आली.स्वच्छ सुंदर हरित बारामतीमध्ये नागरिकांच्या आरोग्य सुविधेवर लक्ष देता आले ते अजितदादा यांच्यामुळेच. २०१६- १७ मध्ये पुन्हा नगरपरिषदेची निवडणूक लागली.तांदूळ वाडी गावाचा नगर परिषद हद्दीत समावेश झाला. त्यामुळेचे हा परिसर झपाट्यानं बदलून गेला. परिसराचा कायापालट झाला. सर्व सोयीसुविधा निर्माण झाल्या.दूरदृष्टी असणारे अजितदादा यांनी माझ्याकडे पहिल्याच वर्षी उपनगराध्यक्ष पदाची धुरा दिली. त्यामुळे बारामती शहराचा हद्दवाढ क्षेत्रातील विविध विकासकामात मला सहभाग घेता आला. वयाच्या ३८ व्या वर्षी अजितदादा यांनी माझ्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी टाकली.राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामती शहराध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी देण्यात आली.
जात- पात, धर्म असे कोणतेही बिरूद न लावता अजितदादा यांनी मला विविध पदावर काम करण्याची संधी दिली. एवढ्या कमी वयात एवढ्या पदांवर काम करण्याची संधी केवळ अजितदादा यांच्यामुळे मिळाली. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून माझा प्रवास सुरू झाला. मात्र, रत्नपारखी असलेल्या अजितदादा यांनी माझ्या कामाची दखल घेत वेळोवेळी मला विविध पदावर काम करण्याची संधी दिली. त्यांनी संधी दिल्यानंतर बारामती शहरातील तांदुळवाडी परिसरात व हद्दवाडी क्षेत्रात जवळपास पाच हजारांहून अधिक झाडे लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला.वृक्षारोपणाची चळवळ संपूर्ण शहरात राबवली. महा रक्तदान शिबिरे घेण्यात आली. त्यामध्ये हजारो बाटल्या संकलित करून गोरगरीब रुग्णांपर्यंत पोहोचविण्यात आले. काशी यात्रेच्या माध्यमातून हजारो भाविकांना काशी दर्शन घडविले. एक तास प्रभागासाठी ही योजना प्रभावी ठरली. अजितदादा यांनी संधी दिल्याने हे सर्व करता आले. त्यामुळे काम करणाऱ्या

कार्यकर्त्यांना संधी देणारा नेता म्हणून अजितदादा यांच्याकडे मी नेहमीच पाहतो. केवळ बारामती पुरतेच असे होते असे नाही.

संपूर्ण महाराष्ट्रात अजितदादा यांची कार्यशैली अशीच आहे. त्यामुळे हजारो कार्यकर्ते अजितदादा पवार यांच्याबरोबर आजही खांद्याला खांदा लावून संपूर्ण राज्यात काम करीत आहेत. सर्वांना बरोबर घेऊन चालणाऱ्या अजितदादा यांना वाढदिवसानिमित्त माझ्या कोटी कोटी शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Rummy Video : रमी नव्हे तर 'हा'गेम खेळत होतो… माणिकराव कोकाटेंनी काय दिलं स्पष्टीकरण?

Manikrao Kokate Rummy: कृषीमंत्री कोकाटेंच्या 'रमी' व्हिडिओनंतर ऑनलाईन गेमिंगवर बंदी येणार का? फडणवीस काय म्हणाले होते?

Ahilyanagar: डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे उपमुख्यमंत्री पवारांच्या हस्ते अनावरण: संग्राम जगताप; २७ जुलैला हाेणार अनावरण

WCL 2025 Video: क्रिकेटमध्ये पुन्हा बॉल-आऊट! द. आफ्रिकेने विंडीजवर मिळवला थरराक विजय

Mumbai News: अनधिकृत बांधकामाला अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन! न्यायालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाईची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT