पुणे

गुजरातचे शिष्टमंडळ करणार विद्या प्रतिष्ठानची पाहणी

CD

बारामती, ता. २६ : गुजरातमधील महाविद्यालयांकडून आता बारामतीच्या महाविद्यालयांचा अभ्यास केला जाणार आहे. शैक्षणिक हब म्हणून उदयास आलेल्या बारामतीच्या दृष्टीने हा एक अभिमानास्पद क्षण आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास नॅककडून अ + दर्जा प्राप्त झाला आहे. यानंतर गुजरात सरकारने गुजरात शासकीय विज्ञान महाविद्यालय (पारडी, जि. बलसाड) या महाविद्यालयास बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे महाविद्यालय पाहून तेथील कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी एक लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या महाविद्यालयाचे शिष्टमंडळ तीन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर येणार असून, विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयात शैक्षणिक, प्रशासकीय, सहशैक्षणिक व गुणवत्ता वृद्धी उपक्रमांचा अभ्यास करणार आहे. या अभ्यासदौऱ्यात प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकसित केलेली शैक्षणिक धोरणे, प्रशासनातील पारदर्शकता, विद्यार्थी विकास केंद्राचे उपक्रम, तसेच नवनवीन उपक्रमांची अंमलबजावणी याची माहिती ते घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP, पंचायत समिती निवडणूक सोपी राहिली नाही, ३ कोटी अन् १०० बोकड; कार्यकर्ते उद्ध्वस्त होतात, शिंदेचे आमदार काय म्हणाले?

Eknath Shinde उपमुख्यमंत्री शिंदेंचा सोशल मीडिया हॅक, Xच्या खात्यावर हॅकर्सनी व्हिडीओ पोस्ट केल्यानं खळबळ

BCCI President : बीसीसीआयचा अध्यक्ष ठरला? माजी क्रिकेटपटूचं नाव चर्चेत...असा खेळाडू जो आपल्याला आठवतंही नसेल; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

रंगभूमीवर नेहा जोशीचा नवा अवतार! विजय तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाईंडर’ नाटकात साकारली ‘लक्ष्मी’ची भूमिका

Latest Marathi News Live Update : उमरगा तालुक्यातील कसगी गावाजवळ पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT