बारामती, ता. १६ : परिश्रमाने अशक्य ते शक्य करता येते ही बाब बारामती तालुक्यातील कोळोली येथे सातव कुटुंबीयांनी सिद्ध करून दाखविली आहे. ठिबक सिंचनाचा वापर करीत पाणी आणि खत व्यवस्थापनाचा अचूक मेळ साधत जिरायती परिसरात पाच एकरांमध्ये केळीची यशस्वी लागवड केली. त्यांनी नुकताच पहिला कंटेनर इराणकडे रवाना केला.
माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव व माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन सातव यांनी कोळोली येथील त्यांच्या जिरायती परिसरातील शेतात केळीची पाच एकर लागवड केली. निर्यातक्षम केळी शेती शिकण्यासाठी प्रगत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भेटी देत या बाबत त्यांनी माहिती घेतली. यामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करीत पाणी आणि खत व्यवस्थापनाचा अचूक मेळ बसवीत निर्यातक्षम केळी उत्पादित केली आहेत. यात एकरी १२५० केळीच्या झाडांची सात बाय पाच अंतरावर लागवड करण्यात आली. २३ महिन्यात केळीची दोन उत्पादन घेणे शक्य असल्याने केळी लागवड फायदेशीर ठरत असल्याचे सचिन सातव व नितीन सातव यांनी नमूद केले.
बारामती तालुक्यातील पणदरे, नीरावागज व जळगाव कडेपठार परिसरात आता केळी शेती घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस, फळबागा व इतर पिकांच्या आधुनिक शेतीमध्ये बारामती पॅटर्न म्हणून पुढील काळात देशामध्ये नावलौकिक कमवेल, अशी अपेक्षा सातव यांनी व्यक्त केली.
बारामती तालुक्यात केळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून अनुदान तत्त्वावर केळी लागवड सुरू आहे. त्यासाठी अर्ज स्वीकारले जात असून २५० हेक्टर केळी लागवडीसाठी अर्ज आलेले आहेत. केळी पिकासाठी पाणी आवश्यक आहे. त्यासाठी पाण्याची सोय करण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजना आहे. त्यातून शेतीपिकांना पाण्याची सोय करणे शक्य आहे.
-सचिन हाके, बारामती तालुका कृषी अधिकारी
13376
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.