पुणे

बारामती रेल्वे स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात

CD

बारामती, ता. ३ : येथील बसस्थानकानंतर आता रेल्वे स्थानकाचाही चेहरामोहरा बदलला आहे. बारामती रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. दीड वर्षांहून अधिक काळ हे काम सुरू होते.
अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील १३०९ रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याची महत्वाकांक्षी योजना सप्टेंबर २०२३ मध्ये रेल्वेच्या वतीने हाती घेण्यात आली. त्या अंतर्गत महाराष्ट्रातील १२३ व पुणे विभागातील बारामती, केडगाव, उरुळी कांचन, हडपसर या चार रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे.
बारामती रेल्वे स्थानकामध्ये दिव्यांगासाठी स्वतंत्र शौचालय उभारले असून, फलाटाची उंची वाढवली आहे. स्वच्छतागृह नव्याने उभारलेले असून, फलाटावरील शेडची नव्याने उभारणी पूर्ण झाली आहे. आता संपूर्ण फलाट शेडने आच्छादित झाला आहे. या शिवाय फलाटावर रेल्वे आल्यानंतर कोणता कोच कुठे येणार आहे, याची माहिती देणारे डिजिटल बोर्ड लावले असून, प्रवाशांसाठी सुसज्ज प्रतिक्षालय करण्यात आले आहे. विद्युतीकरणाचेही नव्याने काम केले जात असल्याने प्रकाश व्यवस्थाही अधिक चांगली असेल.

सुंदर कमान साकारली
भिगवण रस्त्यावरील बाहेरील कमान नव्याने उभारण्यात आली असून, यामुळे रेल्वे स्थानक परिसर सुंदर दिसू लागला आहे. इमारतीचेही नूतनीकरण जवळपास पूर्णत्वाला गेले आहे. प्रवाशांची सोय विचारात घेत अनेक नवीन गोष्टी रेल्वेस्थानकावर तयार करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानक स्वच्छ असेल, ज्येष्ठ नागरिकांनाही सहजतेने वावरता येईल यासाठी सुविधा करण्यात येणार आहे.

13507

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Dharur Police : दिवाळीच्या गर्दीत हरवलेली पर्स पोलिसांच्या तत्परतेमुळे परत मिळाली; एकग्राम सोने व नगद केली परत

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिका पराभूत झाली, पण शुभमन गिलकडून रोहित शर्माचं कौतुक; म्हणाला, 'जशी बॅटिंग केली...'

Bidkin Police : डोंगरू नाईक तांड्यावर तलवार, चाकू, कुऱ्हाडी, एअरगनसह एक जण अटक, शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन; बिडकीन पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT