पुणे

बारामतीत विजांसह दमदार हजेरी

CD

बारामती, ता. १५ : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बारामती तालुक्यात वरुणराजाचे दमदार पुनरागमन झाले. रविवारी (ता. १४) रात्री विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाटासह बारामती शहरासह तालुक्यात सर्वदूर पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. बारामती शहरासह तालुक्यातील काही परिसरात अतिवृष्टीची नोंद झाल्याची माहिती तहसिलदार गणेश शिंदे यांनी दिली.
बारामती तालुक्यात १ जूनपासून पावसाने दडी मारली होती. गणेशोत्सवातही तुरळक पाऊस झाला होता. रविवारी पावसाने दमदार हजेरी लावत बळीराजाला दिलासा दिला. दरम्यान बारामती तालुक्यात या पावसाने नुकसान झालेले नसल्याचीही माहिती गणेश शिंदे यांनी दिली. बारामती शहर व तालुक्यात १ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत २३७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यंदा मॉन्सूनपूर्व पावसाने बारामतीत धुमाकूळ घातला होता. मात्र, जूननंतर पावसाने पाठ फिरवली होती.
रविवारी काही तासांत पडलेल्या पावसाने परिसर जलमय झाला होता. तालुक्यातही शेतात पावसाने पाणी साचून राहिले आहे. दरम्यान तालुका कृषी अधिकाऱ्यांना या पावसाने कोठे काही पिकांचे नुकसान झाले आहे का, याची माहिती घेण्याचे निर्देश दिल्याचे तहसिलदारांनी नमूद केले.
बारामती तालुक्यात रविवारी पडलेला पाऊस मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे- बारामती- ९५, उंडवडी क.प.- ३५, सुपे- ६७, लोणी भापकर- ६३, माळेगाव कॉलनी- २७, वडगाव निंबाळकर- १२८, पणदरे- ४८, मोरगाव- ५१, बऱ्हाणपूर- ६१, सोमेश्वर कारखाना- १४२, जळगाव क.प.- ६०, आठ फाटा होळ- ८५, माळेगाव कारखाना- ८८, मानाजीनगर- ४६, चांदगुडेवाडी-७०, काटेवाडी- ७२, अंजनगाव- ६५, जळगाव सुपे- ७१, केव्हीके- ६८, सोनगाव- ६५, सायंबाची वाडी- ४६, चौधरवाडी-४१, नारोळी- ६३, काऱ्हाटी- ४८, गाडीखेल- ५६, जैनकवाडी- ७८, सावंतवाडी- ७८, मुर्टी- ७८, मोढवे- ८७, सांगवी- ३९, डोर्लेवाडी- ८७, गुनवडी- ८९, देऊळगाव रसाळ- ७६, सिध्देश्वर निंबोडी- १३७.

जळोची ओढ्याला पुन्हा पूर
जळोची ओढ्याला मॉन्सूनपूर्व पावसाने पूर आल्याने काही भागाचा संपर्क तुटला होता. तेव्हा अधिकाऱ्यांनी पाहणी करुन उपाययोजना करण्याची ग्वाही नागरिकांना दिली होती. प्रत्यक्षात येथे काहीही उपाययोजना न झाल्याने पुन्हा एकदा संपर्क तुटल्याचे चित्र निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

SCROLL FOR NEXT