पुणे

टीओडी मीटर ग्राहकांना सवलत

CD

बारामती, ता. १५ : महावितरणच्या टीओडी मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वापरलेल्या विजेच्या युनिटसाठी १ जुलै २०२५ पासून प्रती युनिट ८० पैसे टीओडी (टाइम ऑफ डे) सवलत लागू झाली आहे.
टीओडी मीटर बसवलेल्या बारामती परिमंडळातील ४ लाख ४९ हजार २६८ ग्राहकांना जुलै व ऑगस्ट महिन्यात वापरलेल्या ७२ लाख ९२ हजार ७१८ वीज युनिटसाठी वीजबिलात ५८ लाख ३४ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे.
महावितरणकडून राज्यात ग्राहकांना मोफत स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात येत आहेत. राज्य विद्युत नियामक आयोगाने औद्योगिक नंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच १ जुलै पासून दिवसाच्या वीज वापरामध्ये (टीओडी) प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली आहे. पुढील पाच वर्षांसाठी निश्‍चित केलेल्या वीजदरामध्ये मार्च २०२६ पर्यंत ८० पैसे, सन २०२६-२७ करिता ८५ पैसे, २०२७ ते २०२९ करिता ९० पैसे तर २०२९-३० मध्ये १ रुपये प्रतियुनिट सवलत जाहीर केली आहे.
त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा १ जुलैपासून सुरु झाला आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे.
नव्या तंत्रज्ञानामुळे मीटरचे रीडिंग स्वयंचलित होणार आहे. मानवी हस्तक्षेप टळून अचूक बिले मिळणार आहेत. तसेच घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येणार आहे. त्याद्वारे ग्राहकांचे वीज वापरावरही थेट नियंत्रण राहणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशिन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा आर्थिक लाभ होणार आहे.

वीजबिलात टीओडी सवलत
बारामती मंडळातील ७५ हजार ५९ ग्राहकांना जुलै व ऑगस्ट महिन्यात वापरलेल्या १२ लाख ४१ हजार ६८४ वीज युनिटसाठी वीजबिलात ९ लाख ९३ हजार रुपयांची, सातारा मंडळातील १ लाख ५५ हजार ८९६ ग्राहकांना जुलै व ऑगस्ट महिन्यात वापरलेल्या २१ लाख ७५ हजार ५९९ वीज युनिटसाठी वीजबिलात १७ लाख ४० हजार रुपयांची, सोलापूर मंडळातील २ लाख १८ हजार ३१३ ग्राहकांना जुलै व ऑगस्ट महिन्यात वापरलेल्या ३८ लाख ७५ हजार ४३५ वीज युनिटसाठी वीजबिलात ३१ लाख रुपयांची टीओडी सवलत मिळाली आहे.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT