पुणे

बारामतीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर

CD

बारामती, ता. २२ : शहरात मोकाट जनावरांविरुद्ध नगरपरिषद प्रशासनाने मोहीम हाती घेतली असली तरी मोकाट जनावरांचा प्रश्न अजूनही कायमच आहे. शहरातील उपनगरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अधिक गंभीर आहे. पहाटे फिरायला जाणाऱ्या किंवा रात्री उशिरा कामावरून परत येणाऱ्यांना ही कुत्री त्रास देतात. अनेकदा रात्री उशिरा कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे लोकांची झोपमोड होते. टोळक्याने वावरणाऱ्या कुत्र्यांमुळे लहान मुलांनाही खेळणे अनेकदा अवघड होते.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करण्याची बारामतीकरांची मागणी आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. दुसरीकडे नगरपरिषदेने मोकाट जनावरे पकडण्यासाठी एक एजन्सी नेमली असून, या एजन्सीने आपले काम सुरू केल्याची माहिती नगरपरिषद सूत्रांनी दिली. न्यायालयाच्या निर्णयानुसार मोकाट कुत्री पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. गेल्या काही दिवसात ६५० कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले असून, अशा कुत्र्यांना बेल्ट लावण्यात आले आहेत. खंडोबानगर परिसरात या साठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

13599

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : सरकारच्या लाडकी बहिण योजनेत चार हजार ९०० कोटींचा भष्ट्राचार; खासदार सुप्रिया सुळेंचा घणाघाती आरोप

Pune Encroachment : आंदेकरच्या प्रभावक्षेत्रात अतिक्रमण कारवाई; माहिती देण्यास महापालिका अधिकाऱ्यांची टाळाटाळ

Pune News : थेट मुख्यमंत्र्यांनीच केली खड्ड्यांची तक्रार; पथ विभागाचे थाबे दणाणले

Pargaon News : पारगाव येथे ६५ वर्षीय जेष्ठाची झाडाला फाशी घेऊन संपविले जीवन

Gunaratna Sadavarte:'फक्त वंजाराचा माणूस म्हणून मुंडेंचा राजीनामा, सदावर्ते नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT