बारामती, ता. २५ : केवळ नागरिकच नाही, तर शासकीय विभागही नियमांचे उल्लंघन करतात ही बाब गुरुवारी (ता. २५) समोर आली. शहरातील मुख्य भिगवण रस्त्यावर महावितरणच्या केबल टाकण्याच्या कामासाठी बुधवारी (ता. २४) रात्रीत रस्ता खोदला आला. .
दरम्यान, सकाळी नागरिकांना रात्रीत रस्ता खोदल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही रस्ता खोदल्याचे समजल्यानंतर याची माहिती घेण्यात आली. महावितरणच्या कामासाठी त्यांनी नेमलेल्या कंत्राटदाराने रात्रीत कसलीही परवानगी न घेत रस्ता खोदल्याचे निदर्शनास आले.
अत्यंत वर्दळीचा रस्ता खोदला गेल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागानेही महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत या बाबत नाराजी व्यक्त केली. संबंधित कंत्राटदाराने नुकसान भरपाईची रक्कम भरून ही परवानगी घेणे गरजेचे असताना, अशी कसलीही परवानगी न घेता, कोणतीही पूर्वसूचना न देता खोदाई केली आहे.
दरम्यान, या बाबत संध्याकाळी धावपळ करत खोदलेल्या ठिकाणी डांबर टाकून डागडुजी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काय कारवाई केली? याची माहिती प्राप्त झाली नाही. प्रशासनाने परस्पर समन्वय राखण्याच्या पालकमंत्र्यांनी वारंवार सूचना देऊनही अशा घटना बारामतीत घडत आहेत.
13636