बारामती, ता. २८ : करंजे (ता. बारामती) येथे कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३ केव्ही १० एमव्हीए क्षमतेच्या नूतन उपकेंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. २७) झाले. या उपकेंद्रामुळे परिसरातील १२ गावे वाडीवस्त्यांवरील २७३९ ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. १४१८ कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठ्याची सोय झाली आहे.
याप्रसंगी महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता दीपक लहामगे, प्रभारी कार्यकारी अभियंता सचिन कोरडे, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) विजेंद्र मुळे, करंजे गावचे सरपंच भाऊसाहेब हुंबरे उपस्थित होते.
महावितरणकडून पायाभूत विद्युत सुविधांचे जाळे बळकट करण्यावर विविध योजनांच्या माध्यमातून भर देण्यात आला आहे. कृषी आकस्मिक निधीतील ६ कोटी ६५ लाख रुपये खर्चातून नव्याने उभारण्यात आलेल्या ३३/११ केव्ही करंजे उपकेंद्रात ५ एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. या उपकेंद्रासाठी उच्चदाब विद्युत वाहिनी उभारण्यात आली आहे. त्यात ११ केव्ही शेंडकरवाडी, मगरवाडी, माळवाडी या तीन कृषी वाहिन्या (फिडर) व सोमय्या, करंजेपूल या दोन गावठाण वाहिन्यांचा समावेश आहे. यापूर्वी या परिसरातील गावांचा भार निंबूत, वडगाव, मुरूम व मुर्टी या उपकेंद्रावर विभागलेला होता.
आता या नवीन करंजे उपकेंद्रामुळे शेंडकरवाडी, गायकवाडमळा, सोरटेवाडी, करंजे, चौधरीवाडी, माळवाडी, भापकरमळा, करंजेपूल, दगडेवस्ती, मगरवाडी, नाईकवाडी, शिवबाबा मंदिर ही गावे व वाडीवस्त्यांवरील ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा होणार आहे. त्यात घरगुती ११०८, वाणिज्य १९५ औद्योगिक १८ व कृषी १४१८, अशा २७३९ ग्राहकांना लाभ मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.