पुणे

बारामतीत राष्ट्रवादीची एक जागा निश्‍चित

CD

बारामती, ता. १८ : नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये येथील प्रभाग दोन ‘अ’मधील उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार अनुप्रीता रामलिंग तांबे यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात जल्लोषाचे वातावरण होते.
या जागेवर विरोधकांकडून अर्जच न आल्याने राष्ट्रवादीच्या पारड्यात विनासायास ही जागा पडली. राष्ट्रवादी विरोधात विरोधी पक्षाला सर्व जागांवर उमेदवारच मिळाले नसल्याचे चित्र स्पष्ट झाले. भाजपकडून तीस जागांवर लढण्याचे निश्चित झाले असून, उर्वरित जागांवर राष्ट्रीय समाज पक्ष व काही ठिकाणी अपक्षांना पाठिंबा देत भाजप ही निवडणूक लढविणार आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची यादी जाहीर झालेली नाही. युतीसाठी पक्षाचे प्रयत्न सुरु असून लवकरच याबाबतची अंतिम घोषणा केली जाईल, असे सांगितले गेले. काही प्रभागात उमेदवारांची संख्या कमी असल्याने अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत अजून काही जागा बिनविरोध करता येतात का, याचा राष्ट्रवादीचा जोरदार प्रयत्न सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: अ‍ॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यास ‘बीसीआय’ची स्थगिती; आदेशात नेमकं काय म्हटलं?

Mangalwedha News : नगराध्यक्षपदाच्या तीन अर्जासह नगरसेवकाच्या दोन अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना प्रतीक्षा

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT