बारामती, ता. २१ : येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारत आठ जागा बिनविरोध निवडून आणल्या. पक्षाकडून आणखी चार जागांसाठी प्रयत्न सुरु होते, मात्र त्याला यश मिळाले नाही अन्यथा डझनभर जागा बिनविरोध झाल्या असत्या.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी बारामतीत घडल्या. काही जागा बिनविरोध व्हाव्यात, यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किरण गुजर, सचिन सातव, जय पाटील, अमर धुमाळ यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरु केले होते. त्यामुसार आठ सदस्य बिनविरोध निवडून गेले आहेत. दरम्यान, शेवटच्या दिवशी नगरसेवकपदासाठी ७७ जणांनी, तर नगराध्यक्षपदासाठी दोन जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले.
इतिहास घडला
नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच यंदाच्या निवडणुकीसाठी आठ नगरसेवक बिनविरोध निवडून गेल्यामुळे बारामतीत नवीन अध्याय सुरु झाला आहे. यातही विशेष म्हणजे आठपैकी सहा जागांवर महिला नगरसेविका बिनविरोध विजयी झाल्या आहेत. बारामती नगरपरिषदेची स्थापना १ जानेवारी १८६५ रोजी झाली आहे. त्यावेळेपासून झालेल्या सर्वच निवडणुकांचा इतिहास पाहता कधीही इतक्या जास्त संख्येने नगरसेवक बिनविरोध निवडून गेल्याचा उल्लेख नाही.
नगरसेवक संख्या- ४१
पात्र एकूण अर्ज संख्या- २४७
मागे घेतलेले अर्ज संख्या- ७७
शिल्लक एकूण अर्ज संख्या-१६५
नगराध्यक्ष
पात्र एकूण अर्ज संख्या- १६
मागे घेतलेले अर्ज संख्या- २
शिल्लक एकूण अर्ज संख्या- १४
बिनविरोध
प्रभाग दोन अ- अनुप्रिता तांबे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), पाच अ- किशोर मासाळ, (नागरिकांचा मागास प्रवर्ग), सहा अ- धनश्री बांदल (सर्वसाधारण महिला), सहा ब- अभिजित जाधव (सर्वसाधारण), आठ अ- श्वेता नाळे (नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला), सतरा ब- शर्मिला ढवाण (सर्वसाधारण महिला), अठरा ब- अश्विनी सातव (सर्वसाधारण महिला), वीस ब- अफरीन बागवान (नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला).
BMT२५B१३९७६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.