बारामती, ता. २८ : वाजंत्री वाजविणारे, गमजे घातलेले कार्यकर्ते, हातात उमेदवारांची परिचयपत्रके, सातत्याने जोडणारे हात, अत्यंत नम्रतेने मतदारांना घातली जाणारी साद आणि आम्हीच पाच वर्षे खरा विकास करू, अशी दिली जाणारी ग्वाही...कोपरा सभा, पदयात्रा आणि घरोघरी भेटून मतदारांना आवाहन...अशा बाबींमुळे बारामती शहराचे वातावरण निवडणूकमय झाले आहे.
तब्बल दहा वर्षांच्या कालखंडानंतर बारामती नगरपरिषदेच्या निवडणुका होत असल्याने उमेदवार, कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीसह भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन विकास आघाडीसह दोन्ही शिवसेनेचे उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. उमेदवारांच्या कुटुंबातील प्रत्येकजण प्रचारात स्वतःला झोकून देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आपापल्या प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार व समर्थक करत आहेत.
बारामतीत २० प्रभागांतून ४१ नगरसेवक व नगराध्यक्ष, असे एकूण ४२ जण निवडून जाणार आहेत. परिचयपत्रक, जाहीरनामा, केलेल्या कामांची माहिती, भविष्यातील व्हीजन यांची माहिती मतदारांना देण्यासाठी उमेदवार जिवाचे रान करताना दिसत आहेत. सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत जागरण करून नियोजन केले जात आहे. कार्यकर्त्यांसाठी चहापासून ते जेवणापर्यंत सर्व व्यवस्था उमेदवारांच्या वतीने केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १ डिसेंबरला संध्याकाळपर्यंत प्रचारास परवानगी दिल्याने सर्वांनाच प्रचारासाठी एक दिवस अतिरिक्त मिळाल्याने उत्साहाचे वातावरण आहे. मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत प्रचारास परवानगी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.