पुणे

बारामती- पुणे लोकलसेवा सुरू करण्याची मागणी

CD

बारामती, ता. १ : शहरातील नागरिकांना महत्त्वाच्या सर्व कामांसाठी जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या पुण्याला सातत्याने जावे लागते. बारामतीहून पुण्याला स्वस्तात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे साधन म्हणून जलद बारामती- पुणे लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
ही लोकल सेवा सुरू झाल्यास हजारो प्रवाशांना त्याचा फायदा होणार असून, पंचक्रोशीतून नागरिक या जलद लोकलसेवेचा लाभ घेतील. रस्तेमार्गे पुण्याला जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी वेळेत व कमी खर्चात हा प्रवास सुरू झाल्यास त्याचा फायदा बारामतीकरांना होईल, या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या प्रस्तावाचा विचार करावा, असे नागरिकांचे मत आहे.
सकाळी लवकर निघून कार्यालयीन वेळेपर्यंत पुण्यात पोहोचता येईल व दिवसभराची कामे आटोपून संध्याकाळी पुन्हा पुण्याहून बारामतीला परत येता येईल, असे या लोकलचे वेळापत्रक असावे, अशी नागरिकांची मागणी आहे. सध्या हा प्रवास तीन तासांहून अधिक काळचा असल्याने अनेकजण रेल्वेचा प्रवास टाळतात. वेगवान लोकल सुरू झाली तर प्रवासी संख्याही वाढेल आणि प्रवाशांच्या वेळेत बचतही होईल.
राज्य परिवहन मंडळाच्या बसचे तिकीट हे रेल्वेच्या तिकीटाहून कमालीचे महाग आहे. एसटी बसने प्रवास केल्यासही सव्वा दोन ते अडीच तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे काहीजण रेल्वेला प्राधान्य देतात. हा रेल्वे प्रवास दोन तासांवर आणावा, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

तिकीटातील तफावत लक्षणीय
बारामती- पुणे साध्या गाडीचे १७७ रुपये, हिरकणीचे २३८, शिवशाही बसचे २६४, तर नव्याने सुरू झालेल्या शिवाई गाडीचे तिकीट २८१ रुपये आहे. दुसरीकडे रेल्वेचा महिन्याचा पास अवघ्या ४४० रुपयात मिळतो. याचाच अर्थ महिनाभर दररोज रेल्वेने प्रवास केल्यास ये- जा करून १५ रुपयातच प्रवास होतो. रेल्वेचे बारामती- पुणे तिकीट ३० रुपये आहे.

स्वस्त व कमी वेळेत प्रवास हवा
बारामतीहून पुण्याला दैनंदिन कामकाजासाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. अनेकांना बसपेक्षा रेल्वेचा प्रवास सुखकारक वाटतो. या पार्श्वभूमीवर बारामती- दौंड- पुणे अशी वेगवान लोकलसेवा सुरू केली, तर बारामतीकरांना त्याचा सर्वाधिक लाभ होईल.

व्यापारउदीम अधिक वृद्धींगत व्हावा, कमी खर्चात लवकर पोहोचणारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे साधन म्हणून लोकल सेवा गरजेची आहे.
-सुशील सोमाणी, अध्यक्ष, बारामती व्यापारी महासंघ

लोकलसेवेमुळे लोकांचा वेळ व पैसा या दोन्हीचीही बचतच होईल, वाहतूक कोंडीचा त्रास या मुळे टळेल. लवकर ही सेवा सुरु व्हावी.
- संभाजी किर्वे, मर्चंटस असोसिएशन, बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

Khatron Ke Khiladi 15: ‘खतरों के खिलाडी’च्या पंधराव्या सीझनची थरारक झलक, रोहित शेट्टी पुन्हा होस्ट

ZP Election Result: ग्रामीणचा शिलेदार कोण? आज मतमोजणी; ५०२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

MPSC Recruitment Update : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 2 लाख 17 हजारांहून अधिक पदांची होणार भरती? परीक्षा व भरती प्रक्रियेतही बदलांची शक्यता

Kolhapur ZP : पहिला गुलाल दुपारी १२ वाजता! जिल्हा परिषद निवडणुकीचा थरार शिगेला २५० टेबलांवर मतमोजणी, १८८ फेऱ्या

SCROLL FOR NEXT