पुणे

बारामतीत मतदानासाठी प्रशासन सज्ज

CD

बारामती, ता. १७ : येथील नगरपरिषदेच्या नगरसेवकपदाच्या ४१ जागांपैकी आठ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 33 नगरसेवक पदाच्या व नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी (ता. २०) मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बारामती नगरपरिषद हद्दीतील तांदूळवाडी हद्दीतील मेडिकोज गिल्ड हॉल व रामगल्ली येथील मतदान केंद्रांवर महिला अधिकारी व कर्मचारी तैनात असतील. रेल्वे स्थानकासमोरील ‘म.ए.सो.’चे ग. भि. देशपांडे विद्यालयात मतदान साहित्याचे वाटप केले जाणार असून, त्याच ठिकाणी मतमोजणीही केली जाणार आहे.

कडक पोलिस बंदोबस्त
बारामती नगरपरिषदेच्या मतदान प्रक्रियेत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या साठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरिक्षक श्रीशैल्य चिवडकर व चंद्रशेखर यादव यांनी दिली. स्वतः राठोड यांच्यासह तीन पोलिस निरिक्षक, पंधरा सहायक पोलिस निरिक्षक व १६८ पोलिस कर्मचारी, तसेच ८१ गृहरक्षक दलाचे जवान पूर्णवेळ तैनात असतील. शुक्रवारी (ता. १९) रात्री दहा वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मतमोजणी म.ए.सो.च्या हॉलमध्ये
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर बुधवारी (ता. ३) म.ए.सो.च्या ग. भि. देशपांडे विद्यालयाच्या हॉलमध्येच मतमोजणी होणार आहे. या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ओळखपत्राशिवाय इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दृष्टीक्षेपात मतदानाची तयारी
• एकूण मतदारसंख्या- १ लाख १ हजार ९९२
• नगराध्यक्षपदासाठी उमेदवार- १४
• नगरसेवकपदाच्या ३३ जागांसाठी उमेदवार- १४१
• एकूण मतदान केंद्र संख्या- ११५
• मतदान प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती संख्या- ७५०
• दिव्यांग मतदारांसाठी व्हिल चेअरची सोय
• दोन मतदान केंद्रांवर सर्व महिला अधिकारी व कर्मचारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya: विजय मल्ल्याला भारतात यावंच लागणार… नाहीतर याचिकेचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update : पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजनाचा ऑनलाईन आढावा

SCROLL FOR NEXT