पुणे

जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा

CD

बारामती, ता. २७ : किरकोळ कारणावरून दुकानदाराच्या अपहरणाचा प्रयत्न करून, त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी ज्ञानेश्वर भारत आटोळे (रा. सावळ, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे मटण दुकान असून, २१ डिसेंबर रोजी एका व्यक्तीने रांगेत उभे राहून मटण खरेदीस नकार देत दमदाटी केली. त्या वेळी वजनकाटा उचलून मारण्याचाही प्रयत्न संबंधिताने केला. त्यानंतर ऑनलाइन पेमेंटवरून त्याचे नाव स्वागत हनुमंत सोरटे असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले.
दरम्यान, स्वागत सोरटे याने या घटनेचा राग मनात धरून २५ डिसेंबर रोजी ऋषी गावडे याच्यासोबत ज्ञानेश्वर आटोळे यांना एका मोटारीत पाच जणांच्या मदतीने घातले व जळोची पुलाच्या परिसरात कोयत्याची मूठ, बेल्ट व हाताने मारहाण केल्याची फिर्याद आटोळे यांनी दिली आहे. मोटारीतून जाताना व्हिडिओ कॉलवर स्वागत सोरटे हा ऋषी गावडे व इतरांना सूचना देत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, घटनास्थळी या काळात पोलिस व नातेवाइक पोचल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी अपहरणासह इतरही गुन्हे तालुका पोलिसांनी दाखल केल्याची माहिती पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

दरम्यान, ऋषी गावडे यास पोलिसांनी अटक केली आहे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासात संकेत मुसळे, शीतल बेंगारे (रा. पारवडी) हे गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून इतर आरोपींबाबत तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजनाचा ऑनलाईन आढावा

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT