बारामती, ता. ५ : येथील दि बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अॅड. शिरीष दत्तात्रेय कुलकर्णी यांची, तर व्यवस्थापन मंडळात रिक्त झालेल्या कुलकर्णी यांच्या जागेवर उद्धव सोपानराव गावडे यांची व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
बँकेच्या गुरुवारी (ता. ५) झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. बारामती सहकारी बँक विश्वासाचा वारसा जपणारी बँक असून, बँकेच्या वाटचालीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विचार व योगदान मार्गदर्शक ठरले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बँक आगामी काळात प्रगती करत राहील, असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्षांनी व्यक्त केला.
यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष नूपुर शहा (वडूजकर), तज्ज्ञ संचालक प्रीतम पहाडे, संचालक रोहित घनवट, किशोर मेहता, विजय गालिंदे, देवेंद्र शिर्के, उद्धव गावडे, नामदेवराव तुपे, जयंत किकले, रणजित धुमाळ, मंदार सिकची, डॉ. सौरभ मुथा, संचालिका डॉ. वंदना पोतेकर, कल्पना शिंदे, तज्ज्ञ संचालक अॅड. रमेश गानबोटे, व्यवस्थापन मंडळ सदस्य ओंकार देवळे, कार्यकारी संचालक विनोद रावळ व मुख्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
बँकेकडे आजअखेर २२२२ कोटींच्या ठेवी असून, १३७४ कोटींचे कर्जवाटप केले आहे. ९८० कोटींची गुंतवणूक असून, बँकेचा निव्वळ एनपीए २.५८ टक्के आहे. भांडवल पर्याप्तता प्रमाण १६.७३ टक्के असून, बँकेच्या पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, नाशिक व रायगड या सहा जिल्ह्यांत ३६ शाखा आणि एक विस्तारित कक्ष कार्यरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.