पुणे

बाजारभावाच्या घसरणीमुळे डोळ्यात अश्रू

CD

चाकण ता, २३ : येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजारात नव्या कांद्याची बुधवारी (ता.२२) साडेचौदा हजार पोत्यांची आवक झाली. सुमारे ७२५० क्विंटल आलेल्या कांद्यास प्रति किलोस घाऊक नऊ ते १२ रुपये असा बाजारभाव मिळाला. आधीच कमी झालेल्या बाजारभावात मागील दरापेक्षा दोन रुपये प्रतिकिलो अशी घट झाली. या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. दिवसेंदिवस बाजारभावात होत असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नव्या हंगामातील कांद्याची सध्या देशांतर्गत मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. देशांतर्गत कांद्याची विक्री होत असल्याने कांद्याचे भाव वाढत नाहीत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कांद्याचे भाव कमीत कमी प्रति किलोला वीस रुपयाच्या पुढे असावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, असे चाकण येथील व्यापारी माणिक गोरे, विक्रम शिंदे यांनी सांगितले.
कांद्याचे भाव दिवसेंदिवस घसरत आहेत. चौदा रुपये किलोवर गेलेला कांदा अगदी बारा रुपये किलोवर आला आहे. दोन रुपयाची घसरण ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी आहे, असे व्यापारी अकबर भाई यांनी सांगितले .


खेड तालुक्यातून नवीन कांदा बाजारात विक्रीसाठी येत आहे. हा कांदा स्थानिक परिसरातीलच पुणे, नगर जिल्ह्यातील आहे. चाकण येथून देशांतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, कोकण भाग, मराठवाडा, विदर्भ, दिल्ली, बंगळूरू, केरळ, चेन्नई, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक आदी भागात कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात पाठविला जात आहे. परराज्यातील व्यापारी कांदा खरेदीसाठी बाजारात येत आहेत. तसेच काही व्यापारी ऑनलाइन चाकण येथील व्यापाऱ्यांशी, शेतकऱ्यांशी संपर्क साधून खरेदी करत आहेत. नवीन कांद्याची आवक मार्च, एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढेल, असे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गोरे, संपत पानसरे यांनी सांगितले.


सध्या देशांतर्गत कांद्याची खरेदी- विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारभावात घसरत होत आहे. नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. पुढील दोन महिने मोठ्या प्रमाणात आवक होईल. भाव सध्या घसरत असून यापुढेही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
- बाळासाहेब धंद्रे, सचिव, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती

निर्यातक्षम कांद्याचा अभाव...
बाजारात सध्या पंचगंगा लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. हा कांदा निर्यातयोग्य नसतो. हा कांदा अडीच महिन्याचा आहे. साडेतीन महिने कालावधीचा कांदा निर्यात योग्य, हळवा जातीचा फिक्कट लाल असतो. पण असा कांदा बाजार येत नाही सध्या अशा निर्यातक्षम कांद्याचा अभाव आहे. असे व्यापारी, निर्यातदार प्रशांत गोरे पाटील, जमीरभाई काझी यांनी सांगितले.
....
पूर्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT